पेसा समितीच्या अध्यक्ष पदी अशोक पाडवी यांची निवड

50

पेसा समितीच्या अध्यक्ष पदी अशोक पाडवी यांची निवड

✍️ प्रकाश नाईक

नंदुरबार ब्युरो चीफ

मो. 📱9511655877

 नंदुरबार : दि. 2 सप्टेंबर अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पेसा समितीच्या अध्यक्षपदी अशोक पाडवी यांची निवड करण्यात आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे ग्रुप ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी वाण्याविहिर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नीलिमा महेश वळवी हे होते.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, विविध विकास कामे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्राम जमा कोश समिती स्थापन करण्यात आली. जलजीवन मिशन योजना, बंदिस्त गटार इत्यादी विषयावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी सभेला जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दौलतसिंग पाडवी, माजी सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जर्मनसिंग पाडवी, नरेंद्र तडवी, राहुल सुरज खाटीक, सरलाबाई नाईक, भटाबाई सैंदाणे, भारतीबाई पाडवी, ज्योती पाडवी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेचे कामकाज ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसेवक सुरेश गावित यांनी पाहिले.यावेळी पेसा समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते माजी सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी तर सदस्य पदी सरलाबाई रवींद्र नाईक यांची निवड करण्यात आली होती.