पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी जव्हार येथे तात्काळ प्रमोद मौळे यांनी रक्तदान करून केली गरीब अनाथ रुग्णाला मदत.

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

       जव्हार तालुक्यातील पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी ही एकमेव पालघर जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढी असुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक वरदान ठरत असुन आज जव्हार तालुक्यातील न्याहाळे ग्रामपंचायत पैकी अति दुर्गम भागातील गावनंदपाडा गावामधील गरीब कुटुंबातील एक अनाथ मुलगी ही निर्जला दिघा या रुग्णांला तिच्या शरीरात रक्त कमी असल्याने तिला पुढील उपचारा करिता AB+ पॉझिटिव्ह अत्यंत रक्ताची गरज असल्याची माहिती समाजिक कार्यकर्ते निलेश रावळ यांनी जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ रक्तदान गृपच्या, मी रक्तदाता ग्रुप, जिजाऊ सामाजिक ग्रुप, माध्यमातून युवा रक्तदात्यांना आवाहन केले असता सदर सोशल मीडियाची माहिती मिळतात पत्रकार प्रमोद मौळे स्वतः रक्तपेढी येथे येऊन एक पिशव्या रक्तदान करून सदर रुग्णांना मददत केली.

याबाबत त्याचे सामाजिक दायित्व बघून या दाणवीर रक्तदात्यांचे सर्वच स्तरातुन नातेवाईका मधून व तालुक्यातून अभिनंदन-कौतुकाचा वर्षाव केले जात आहे. तसेच सदर युवा आदिवासी संघ रक्तदाता गृप,मी रक्तदाता ग्रुप,जिजाऊ समाजिक ग्रुप हा एक हात मद्यतीचा उद्देशाने तयार करण्यात आला असून हा उद्देश सफल होत असल्याचे सर्वच गृप मधील सभासद कडून बोलले जात आहे.

तालुक्यातील सोशल मीडिया द्वारे एका अनाथ मुलीला तात्काळ AB+ पॉझिटिव्ह अत्यंत रक्ताची गरज असल्याची माहिती समाजिक कार्यकर्ते यांच्याकडून समजतात मी माणुसकी हा माझा धर्म म्हणून त्या मुलीला रक्त दान केले असून ; उपवास करून देव मिळत नाही तर उपवास करून बुद्धीच्या-माणुसकी द्वारे गरजेला मदत करून देव बघता येतो अस मला वाटते म्हणून हा संदेश सर्व विश्वाला देण्याचा पर्यत केला आहे – प्रमोद मौळे,  समाजिक कार्यकर्ते, युवा पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here