मोखाडा पंचायत समिती आयोजीत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न   

63

मोखाडा पंचायत समिती आयोजीत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न                     

सौरभ कामडी

मोखाडा प्रतिनिधी

पंचायत समिती मोखाडा आयोजित तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम, साई हाॅल, मोखाडा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. त्यात श्री ललित अनंतराव मोरे जि प शाळा – पवारपाडा, केंद्र – पोशेरा ता.मोखाडा, जि. पालघर येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक श्री ललित अनंतराव मोरे यांचा सपत्नीक व कुटुंबासह मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याआधीही त्यांना उपक्रमशील शिक्षक म्हणून पंचायत समिती मोखाडा तर्फे तसेच स्वाभिमान शिक्षक संघ, महाराष्ट्र तर्फे राज्य स्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान खुपच उल्लेखनीय आहे. त्यांनी प्रयास फाऊंडेशन या नवी मुंबई येथील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेशी संपर्क करुन संस्थेच्या माध्यमातून ८-१० वर्षात आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक साहित्य व शालेय उपयोगी साहित्य मोखाड्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. व दरवर्षी लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती व संस्थांशी संपर्क साधुन त्यांनी शाळेला वस्तुरुपाने किंवा आर्थिक स्वरूपात मदत मिळवली आहे. तसेच शालेय परिसर सुशोभित करुन वृक्षारोपण करुन शालेय आवार स्वच्छ व सुंदर केलेला आहे. तंत्रस्नेही शिक्षक असल्यामुळे शाळा देखिल डिजिटल केलेली आहे. व शाळेत रोज डिजिटल पद्धतीने दैनिक परिपाठ घेतला जातो. शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर करून प्रभावी अध्यापन केले जाते. त्यांनी जि प शाळा वखारिचापाडा व पवारपाडा येथे कार्य करीत असतांना दोन्ही शाळेत निश्चितच आमुलाग्र बदल झालेला दिसून येतो.

गणेशोत्सवानिम्मित अमेझॉनची खास ऑफर, नक्की पाहा.

देशसेवा करण्यासाठी विद्यार्थी घडावेत म्हणून विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच सैनिकी शिक्षण दिले जात आहे, ही खरंच खुप कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे म्हणून ते स्वतः व्यायाम प्रकार करुन विद्यार्थ्यांकडून देखिल नियमितपणे व्यायाम करुन घेतात. भावी अधिकारी तयार व्हावेत म्हणून शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करुन सराव घेतला जातो. त्यांनी आतापर्यंत राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय विविध प्रशिक्षणे घेऊन तालुका व केंद्रस्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन तसेच क्रीडास्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत मजल मारलेली आहे. ते विद्यार्थी हितासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम सातत्याने राबवत असतात.

तसेच ते गावातील नागरिकांना देखिल आवश्यक तेथे मदत व मार्गदर्शन करत असतात. अशा होतकरू व मेहनती तसेच देशासाठी उत्कृष्ट भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.