धडगांव तालुक्यातील गोंराबा येथील एका महिलेची छेळ, धडगाव पोलीस स्टेशन मध्ये नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल
प्रकाश नाईक
नंदुरबार ब्युरो चीफ
मो.📱 9511655877
नंदुरबार : दि. 11- सप्टेंबर धडगाव तालुक्यातील गोरांबा गावात डाकिणीच्या संशयातुन एका महिलाच्या छळ केल्या प्रकरणी घटना घडली असुन धडगांव पोलीस ठाण्यात दिनांक 6/9/2023 रोजी भा. द. वी. कलम 354,143,147, 149, 323, 427, 506, 50 इ. कलम वापरण्यात आले होते.
महाराष्ट नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व ३ (२) अधोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्या बाबत अधिनियम 2013 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
घटनेत 30 वर्षीय महिलाला गावातील लोकांनी, तु डाकीण आहेस आमच्या मुलांना जादुटोणा करुन मारुन टाकले असा आरोप करत अपशब्दाच्या वापर करुन ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत त्या महिलेच्या फिर्यादीवरून बाबू दुधल्या पाडवी वय (५०) व मोगरा बाबू पाडवी वय (48) तसेच चद्रसिंग बाबू पाडवी वय (३२) यांच्या सह नऊ जणांविरुद्ध धडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.