'क' झोन कबड्डी स्पर्धेत रेणुकादेवीच्या मुलांचा संघ अजिंक्य; मुलींच्या संघाला तृतीय स्थान..

‘क’ झोन कबड्डी स्पर्धेत रेणुकादेवीच्या मुलांचा संघ अजिंक्य;

मुलींच्या संघाला तृतीय स्थान..

'क' झोन कबड्डी स्पर्धेत रेणुकादेवीच्या मुलांचा संघ अजिंक्य; मुलींच्या संघाला तृतीय स्थान..

✍️गोपाल नाईक✍️
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मो 74998 54591

श्रीक्षेत्र माहूर : – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगरच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आयोजित ‘क ‘ विभाग स्तरावरील कबड्डी स्पर्धेत श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने नांदेडच्या गुरू गोविंदसिंग महाविद्यालयाच्या संघास अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करीत अजिंक्य पद पटकावले तर मुलींच्या संघातील एका कबड्डीपटूस खेळतांना गंभीर दुखापत झाल्याने तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. कबड्डी स्पर्धेत गेल्या दोन दशकांपासूनचा महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला आहे.
मुलांच्या संघात कर्णधार सौरभ राठोड, शक्तिमान शेडमाके, अजय राठोड, प्रज्ञावंत जाधव, पंकज मेश्राम, सचिन राठोड, पंकज राठोड, गोपाल राठोड, कृष्णा राठोड, सोपान राठोड, रविकांत कोहचाडे, गजानन शेंडे तर मुलींच्या संघात कर्णधार मोनू पेंदोर, श्रद्धा जाधव, वेदिका तिवारी, दिव्या शेंडे, सोनाली पेंदोर, राणी पेंदोर, प्रियांका तांबारे, सारिका बुरकुले, सारिका मेंडके, अंकिता टणमणे, पायल जाधव, दीपाली राठोड यांचा समावेश होता.
सदरील स्पर्धेत २० महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास क्रीडा संचालक डॉ. धरमसिंग जाधव, प्रेम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रो. पदमा मदकुंटे यांनी संघ व्यवस्थापिका म्हणून काम पाहिले.
विजयी संघाचे व मार्गदर्शकांचे बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड ,उपाध्यक्ष किशोरजी जगत, सचिव सौ.संध्याताई राठोड, सहसचिव नकुलजी राठोड ,
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.तुळशीदास गुरनुले,प्राध्यापक,
शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here