उमरखेड तालुक्यातील दहा गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा

53

उमरखेड तालुक्यातील दहा गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा

maratha-morcha-maharashtra

आर. जि. भालेराव 

उमरखेड तालुका प्रतिनिधी

मो. 9637107518

उमरखेड: दि. 12 सप्टेंबर, उमरखेड तालुक्यातील तिवडी, सुकळी ज. देवसरी, कुपटी, पिंपरी दिवट, नागापुर, पळशी, वाने गांव पार्डी या गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी, स्त्रीया युवक अशा मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आक्रोश मोर्च्या काढून तहसिल प्रांगणात मागील 8 दिवसापासुन 5 युवक आमरण उपोषण करीत आहे. त्यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो युवक उपोषण स्थळी दाखल झाले.

 मोर्च्या मध्ये एकच मिशन मराठा आरक्षण, अशा घोषणा देत राज्य व केंद सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्च्या काढण्यात आल्या भजन किर्तन च्या माध्यमातुन मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याची विंनतीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

दरम्यान उपोषषकर्ते सचिन घाडगे यांनी मराठा समाजाला विंनती केली की, आपण कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये…!

अशा प्रकारची विंनती केली आहे. सर्वांनी कायदेशीर मार्गाने आपला लढा लढू असेही आवाहन केले आहे. या दरम्यान डफडे आंदोलन सुद्धा करण्यात आले.

यावेळी हजारो सकल मराठा समाजाचे युवक, महीला, विद्यार्थीनी आणि समाज बांधव हजर होते.यादरम्यान पोलीस स्टेशन चे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी शांततेचे आवाहन केले.