अखेर बहुप्रतिक्षेनंतर चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या डांबरीकरण कामाचे आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन…
सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
अखेर तिन वर्षाच्या मोठया बहुप्रतिक्षेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि वाहन धारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामास चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार .सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून कामास भुमिपुजनाने प्रारंभ करण्यात आले मात्र गावात लावण्यात आलेल्या फलकांमध्ये रामा ४ ते चुंचाळे रस्ता १३ किमी ०/७०० ते २/५०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते यांना विचारणा केली असता त्यांनी ही स्पष्ट सांगितले की,अगोदर जि.प.अंतर्गत करण्यात आलेला ०/७०० पर्यंत चा रस्ता सोडून पुढे काम करण्यात येणार असून पुन्हा चुंचाळे, बोराळे करांना या उर्वरित रस्त्याची डोके दुःखी सहन करावी लागणार आहे,पुन्हा चिखलातून निघून फफुट्यात पडण्याची भीती आहे.
तरी संबधित उर्वरित रस्ता देखील जि.प.बांधकाम विभागाने दुरुस्त करावा ही मागणी गावातून होत आहे, कारण अभियंता यांनी स्पष्ट पने सांगितले आणि तश्या प्रकारे उल्लेख देखील करण्यात आला आहे,तसेच यावल तालुक्यातील व चोपडा मतदारसंघात असलेले चुंचाळे आणि बोराळे गावात आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन बोराळे गावात पाच लक्ष रूपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक काम व मागील तिन वर्षापासुन वाहनधारकां साठी डोकेदुखी ठरलेले व दुरूस्तीच्या बहुप्रतिक्षेत असलेले चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव रस्त्याच्या ०/७०० सोडून, डांबरीकरणासाठी ५७ लाख व बोराळे गावासह चुंचाळे येथे दहा लाख रुपये निधीचे पेव्हर ब्लॉक आणि जि.प.च्या ताब्यात असलेला चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव रस्ता,०/७०० सोडून डांबरीकरण ५७ लाख रुपये निधीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आ.लताताई सोनवणे व माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मोठया संख्येत गावातील ग्रामस्थ लोकनियुक्त सरपंच नौशाद मुबारक तडवी आणी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सूर्यभान पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत, विकी वानखेडे,नथू धनगर, बबलू धनगर ,रहमान तडवी, लोटू धनगर, मनोज धनगर,दीपक कोळी, सुधाकर कोळी, मुबारक तडवी, प्रदीप वानखेडे, सुपडू संदानशिव सामाजिक कार्यकर्ते, पुनम राजपूत,कुरबान तडवी,अनिल कोळी संजय राजपूत,संजू चौधरी,मुळा तडवी,कलिंदर तडवी,ऋषी राजपूत,संदीप वानखेडे,प्रेम मराठे,गोकुळ कोळी,निलेश राजपूत,सुमित राजपूत, गणेश राजपूत,अमर वानखेडे तसेच सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते,तरी उर्वरित रस्त्याचे काम देखील जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गी लावण्याची मागणी गावातून होत आहे.