सरदार पटेल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा…. • चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (म. रा.) यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलंसचे प्रमाणपत्र देऊन गौरव

48
सरदार पटेल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा.... • चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (म. रा.) यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलंसचे प्रमाणपत्र देऊन गौरव

सरदार पटेल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा….

• चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (म. रा.) यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलंसचे प्रमाणपत्र देऊन गौरव

सरदार पटेल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा.... • चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (म. रा.) यांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलंसचे प्रमाणपत्र देऊन गौरव

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 13 सप्टेंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेला करिअर कट्टा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलंस मंजूर झाल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवाळकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि करिअर कट्टाचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील फक्त २५ कॉलेज पहिल्या यादीत सेंटर ऑफ एक्सलंस करता पात्र ठरले आहेत. चंद्रपूर जिल्यातील सरदार पटेल महाविद्यालयाचा समावेश असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करिअर कट्टा उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सरदार पटेल कॉलेजला २ वेळेस शिक्षण मंत्र्यांनी सरदार पटेल महाविद्यालयाचा सन्मान केला आहे. कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. पी. एम काटकर सर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी सन्मान स्वीकारला. करिअर कट्टा महाविद्यातील समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांनी सेंटर ऑफ एक्सलंस मिळविण्यासाठी सतत कार्य करून ते मिळवून घेतले.

याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सदस्य सागुनाताई तलांडी, राकेश पटेल, दिनेश पटेल, आम. किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, व सर्व विश्वस्त तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थांनी अभिनंदन केले.