खा.विनायक राऊत यांच्या शुभहस्ते श्रीस्वामी गगनगिरी लिलामृत ग्रंथाचे प्रकाशन.


प्रतिनिधी 

रत्नागिरी:- सिंधूदुर्ग जिल्ह्याचे  खा.आणि महाराजांचे परम गुरू भक्त  विनायक राऊत यांच्या शुभहस्ते “श्रीस्वामी गगनगिरी लिला अमृत” या ग्रंथाचे प्रकाशन असंख्य भाविकांच्या साक्षीने झाले सदर ऐतहासिक सोहळ्यात खा. राऊत  भाविकांना संबोधीत करताना म्हणाले आपण पैशाने अनेक सुखे हंगामी खरेदी करू शकतो पण खर समाधान मात्र गुरु कृपेनेच प्राप्त होते, जीवनात माझे आई-वडीलां नंतर दोन गुरु एक शिवसेना प्रमुख, आणि दुसरे प.पु.गगनगिरी महाराज  यांच्या आशिर्वादानेच हा विनायक खासदार झाला, या ऐतहासिक सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात भाविकांना संबोधीत करताना उप-तालूका प्रमुख तात्या सरवणकर म्हणाले महाराज ६ डीसेंबर  २००६ रोजी हेलीकॉप्टर ने केळवलीत उतरले त्या वेळी मला मा. सुनील प्रभू यांच्या मुळे महाराजांच्या अगदी जवळ जाता आले त्या नंतर माझ्या राजकीय जिवनात उजाळा यायला लागला त्यामुळे मी महाराजांची मिळेल ती सेवा सतत करत रहाणार महाराजांच्या अनेक लिला पैकी काही अत्यंत महत्त्वाच्या लिला या ग्रंथात अगदी महाराजांच्या वाणीत गुरु दासांनी वर्णन केल्या आहेत त्या लिला वाचनाने भाविकांना आपले जीवन उजळण्यास नक्कीच मदत होईल या सोहळ्याचे प्रस्ताविक व आभार गुरुदास कृष्णा (बाबा) हरयाण यांनी केले तर मान्यवरांना शाल-श्रीफळ मनोहर हरयाण व सौ. विजया कृ. हरयाण यांनी देऊन त्यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here