सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची धक्काबुक्की सह जीवे ठार मारण्याची धमकी

61

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची धक्काबुक्की सह जीवे ठार मारण्याची धमकी

मन्सूर तडवी

चोपडा तालुका प्रतिनिधी

चोपडा ग्रामीण पो.स्टे. हद्दी मध्ये असलेल्या रोडच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्फत लावण्यात आलेले मोठ मोठे झाडे हे चोपडा येथील वखार मालक हे कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी शिवाय सर्रास पणे झाडे तोडुन चोरी करीत असल्याबाबत नागरीकांकडून सतत तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागात येत होते.

 त्याच प्रमाणे दिनांक १३/०९/२०२३ रोजी दुपारी सुमारे ०३.०० वाजेचे सुमारास सार्वजनिक बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे यांना गुप्त बातमी मिळाली की, बुधगाव फाटा ते बुधगाव गावाचे दरम्यान असलेल्या रोड लगत बाभळीचे झांडाची कटाई चालु आहे. तेव्हा त्यांनी त्याचे सोबत असलेले सहाय्यक हर्षदिप राजपुत यांना सोबत घेवुन गेले असता त्यांना बुधगाव फाट्यापासून बुधगाव कडे सुमारे ३ किमी अंतरावर बुधगाव फाट्याकड एक आयसर गाडी क्र MH – 15BJ-7956 येतांना दिसल्याने त्यांना संशय आला असता त्यांनी वाहन चालक यास वाहन थांबविण्याचा इशारा दिल्याने सदर चे वाहन थांबविले. असता बालाजी दहिफळे यांनी सदर गाडी चेक केली असता त्यात १० हजार रुपये किमंतीचे अडीच टन लाकुड अवैध रित्या तोडुन भरलेले आढळले.

तेव्हा सदर वाहन चालक यास वाहन पोलीस स्टेशन मध्ये घेवुन चल असे सांगत असतांना तेथे अयुब युसुफ सरदार (रा.बारा मोहोल्ला मणियार अली) चोपडा हा आला व त्याने दहिफळे यास तुम्ही माझी गाडी का अडवली तुम्हाला काय अधिकार आहे. असे म्हणुन शिवीगाळ केली. तसेच त्यांचा हात पिळुन धक्का बुक्की केली व सदरची गाडी पळवुन नेण्यास लावले व जिवे ठार मारण्याची धमकी देवून अधिकारी करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा निर्माण केला. श्री दहिफळे यांनी चोपडा ग्रामीण पो.स्टे. ला फिर्याद दिल्यावरुन गु.र.न. ०१६७/२०२३ भादवी कलम ३५३,३७९,३३२,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कमलाकर कावेरी यांचे आदेशान्वये स.फौ. देविदास शंकर ईशी हे करीत आहे.