उमरखेड येथील सत्ताधिशांना सक्षम विरोधक मिळणार- विलासराव चव्हाण

सिध्दार्थ दिवेकर

उमरखेड प्रतिनिधी

मो.9823995466

उमरखेड, दि.14 सप्टेंबर: उमरखेड शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने तसेच शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्या च्या दृष्टीने काम करण्यासाठी गांजेगावकर कॉम्प्लेक्स नांदेड रोड उमरखेड येथे सर्वसामान्यांची व समाजसेवकांची बैठक होऊन “छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीची” स्थापना करण्यात आली ही समिती जनतेच्या हितासाठी सामाजिक व राजकीय काम करत असताना राजकीयदृष्ट्या देखील लोकांची कामे व्हावी म्हणून येणाऱ्या नगरपरिषद निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने देखील निवडणुकीत सहभाग घेणार असल्याचे मत छत्रपती श्री शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी आज रोजी स्थानिक विश्राम गृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नागरिकांच्या सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समिती कटिबद्ध!  

  मुख्य मार्गदर्शक पदी रज्जाक शाहीद जनाब यांची तर संघटनेच्या अध्यक्षपदी संपादक विलासराव चव्हाण (संपादक जयराज सिंहासन तथा मार्गदर्शक संयुक्त पत्रकार संघ उमरखेड) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली अवघ्या काही दिवसात संघटनेच्या सभासदात वाढ करण्यात येईल व त्यांच्या विचाराने जनतेची सामाजिक व राजकीय कामे करण्याकरिता सक्षम कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याचे सांगून मागील साडेसहा वर्षांपासून नगरपरिषद उमरखेड मध्ये तत्कालीन सत्ताधारी व विरोधक जनतेच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा त्याच त्याच प्रस्थापित लोकांना सभागृहात पाठवण्यापेक्षा नवीन विचार घेऊन पुढे येणाऱ्या तरुण तडफदार व समजदार व्यक्तींना सामाजिक राजकीय भान असणाऱ्या जनहितासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या लोकांना सभागृहात पाठवण्याची आज गरज आहे.

 जनतेने सत्ताधारी लोकांची चांगली वाईट कामे पाहिली व विरोधकांची खामोशीही पाहिली उठवलेले आवाज दबलेले ही पाहिले एकूणच सत्ताधारी विरोधकांची एक प्रकारची मिलीभगत असल्याचे चित्र शहरात व तालुक्यात निर्माण झाले आहे. यासाठी उमरखेडचा नागरिक व कॉमन मॅन त्रस्त झाला आहे.

 मागील साडेसहा वर्षांपासून शहरात काय होत आहे आणि काय होत नाही यावर आज चर्चा करण्यापेक्षा पुढे अनेक मुद्दे घेऊन आमची संघटना पुढे येणार आहे.तूर्तास संघटना स्थापन करून ती संघटना मजबूत करणे व पुढे जनतेची सामाजिक व राजकीय कामे करणे प्रस्थापित राजकारण्यांना सभागृहात जाण्यापासून रोखण्यासाठी आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये संघटनेचे उमेदवार ताकतीने उभे करणे हा एकमेव उद्देश घेऊन आज संघटने ची आम्ही स्थापना केली अशी माहिती छत्रपती शिवाजी श्री महाराज रयत संघर्ष समिती चे अध्यक्ष विलासराव चव्हाण यांनी आज रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

यावेळी संयुक्त पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवेश कवडे यांचे स्वर्गवासी वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पत्रकार परिषदेस छत्रपती श्री शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचे मुख्य मार्गदर्शक रजाक शाहिद जनाब,अध्यक्ष विलासराव चव्हाण, जयवंता मेने, अमोल नरवाडे, इरफान भाई व पत्रकार बांधव हजर होते. एकूणच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या कार्यकाळात हतबल झालेल्या जनतेस छत्रपती श्री शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीच्या स्थापनेने एक सर्व समावेशक निस्वार्थ सक्षम वैचारिक नेतृत्व मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here