शिक्षण संचालक महेश पालकर यांचा यावल शिक्षण विभागातर्फे सत्कार
मन्सूर तडवी
चोपडा प्रतिनिधी
यावल शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अचानक यावल येथील शिक्षण विभागाला भेट दिली असता त्यांच्या यावल शिक्षणा विभागा अंतर्गत जाहीर सत्कार करण्यात आला.
शिक्षण संचानाल्य योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती तसेच बीबी हजरत महल व नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे कामकाज प्रत्यक्ष अंगलो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जळगाव , अंग्लो उर्दु हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज एरंडोल तसेच विद्यानिकेतन जळगाव येथे स्वतह पाहणी केली व योजना बाबत . सर्व अधिकारी जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले तसेच शासनाची नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबत ही सविस्तर माहिती दिली .
जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभाग ( मध्य )यांच्या वतीने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती व बीबी हजरत महल शिष्यवृत्ती योजना बाबत आढावा घेण्यात आल . त्यात दिपाली पाटील _सहाय्यक योजना अधिकारी यांनी .मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माध्यमिक सचिन परदेशी तसेच उपशिक्षण अधिकारी एजाज शेख, उपशिक्षणाधिकारी पठाण ऊपस्थित होते यावेळी सत्कार आयडियल उर्दू हायस्कूलचे मारुळ येथिल मुख्याध्यापक अश्फाक शेख व डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल जूनियर कॉलेज जीएन खान, डीबी. साळुचे आदीनी सत्कार केला. आभार जावीद पिंजारी व रईस शेख यांनी मानले .