अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी काठी रस्त्याची संरक्षण भिंतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे…

57

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी काठी रस्त्याची संरक्षण भिंतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु, युवासेना जयवंत पाडवी यांचे आ. आमश्या पाडवी यांना दिले निवेदन

प्रकाश नाईक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी

मो.9511655877

नंदुरबार :- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु होत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे मोलगी ब्लॉक प्रमुख जयवंत पाडवी यांने विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांना निवेदन दिले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मोलगी हे गाव सातपुड्यातील एक मुख्य बाजारपेठ असून याठिकाणी अनेक गाव पाड्यातील नागरिक बाजारपेठ मध्ये येत असतात. काही शैक्षणिक कामा निमित्ताने तर काही किराणा, भाजीपाला, व मोलगी मध्ये ग्रामीण रुग्णालय आहे त्यामुळे रुग्ण दवाखान्यात येत असतात. मोलगी हे एक अतिदुर्गम भागातील एक मुख्य बाजारपेठ आहे याठिकाणी लांब लांबून लोक येत असतात काही तर व्यापारी सुद्धा येतात त्यामुळे मोलगी ते काठी या रस्त्याची संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरु होत आहे त्याची बांधकाम विभागाने त्याची चौकशी केली पाहिजे व या रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम जे कोणी ठेकेदारांनी घेतले असेल त्याची चौकशी करून त्याचावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदन मध्ये करण्यात आली आहे. जर चौकशी झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करू असे युवासेनेचे जयवंत पाडवी यांनी सांगितले आहेत.

यावेळी निवेदन देतांना युवासेनेचे मोलगी ब्लॉक प्रमुख जयवंत पाडवी, रघुवीरसिंग पाडवी, रतनसिंग पाडवी, खेमा वळवी, रंजित वळवी, रामसिंग पाडवी, संदीप तडवी, मानसिंग पाडवी, केशव वसावे आदी उपस्थित होते.