रायगडमध्ये एसटी बसची कंटेनरला धडक १ ठार १६ प्रवासी जखमी

51

रायगडमध्ये एसटी बसची कंटेनरला धडक १ ठार १६ प्रवासी जखमी

सचिन पवार

रायगड प्रतिनिधी

रायगड मधून धक्कादायक बातमी मुंबई गोवा महामार्गावर माणगांव तालुक्यात रेपोली गावच्या हद्दीत नायरा पेट्रोलच्या समोर 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 17 सप्टेंबर पहाटेच्या सव्वा चार वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजू कडून ठाणा राजापूर ही एसटी बस महाड बाजूकडे जात असताना कंटेनरला जोरदार धडक झाली यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू तर 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता घटनास्थळी पोलीस प्रशासन साळुंखे रेस्क्यू टीमचे माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह दाखल होऊन मदत कार्याला सुरुवात केली व पोलीस क्रेन च्या साह्याने वाहन एसटी बस बाजूला केली व ट्रॅफिक सुरळीत केली.

सध्या गणेशोत्सवा निम्मित मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांची गर्दी वाढल्याने महामार्गावर ट्रॅफिक जाम होत आहे. त्यातच महामार्गावरील खड्यांची योग्य वेळी डागडुजी न केल्याने नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅफिक जॅम आणि रस्त्यांची दुरावस्था यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.