जनता महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

65

जनता महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

चंद्रपूर, 18 सप्टेंबर: चांदा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील जनता महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. ए. के. महातळे, उपप्राचार्य तथा वाणिज्य विभागप्रमुख प्रा. व्ही. एस. बोढाले, नॅक समन्वयक डॉ. एन. आर. बेग, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एफ. डब्लू निरंजने यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम, शैक्षणिक अभ्यास सहली, प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याचप्रमाणे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाकरिता आयोजित होणार्‍या कार्यशाळा व सेमिनारबद्दलची माहिती यावेळी देण्यात आली.