नांदगाव पैकी राजेवाडी येथे हरितालिकेच्या दिवशी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

54

नांदगाव पैकी राजेवाडी येथे हरितालिकेच्या दिवशी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

सौरभ कामडी   

मोखाडा प्रतिनिधी   

पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी येथे हरितालिकेच्या दिवशी आदिवासी हिरवा देवाची स्थापना करण्यात आली. दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी नांदगाव पैकी राजेवाडी येथे आगळा वेगळा कार्यक्रम हरितालिकेच्या दिवशी करण्यात आला त्यामध्ये आदिवासी हिरवा देवाची स्थापना करून त्याठिकाणी १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात सगळ्या भाविकांना दर्शन घेता येईल .आदिवासी हा त्यांच्या रूढी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे निसर्ग पूजक म्हणून आदिवासींची ओळख साऱ्या जगतात आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन राजेवाडी तील तरुणांनी एकत्र येऊन आयोजन करण्यात आलं निसर्गाच्या सानिध्यात देखाव्यात हिरवा देवाची स्थापना करून .पुढील पिढीला आदिवासी समाजाचे देवतांची माहिती व्हावी यासाठी आदिवासी हिरवा देव उस्तव समितीची स्थापना करून वेगवेगळ्या प्रकारे गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत या कार्यक्रमात सात दिवस आदिवासी संस्कृती परंपरा जतन होण्यासाठी व्याखने आयोजित करण्यात येणार आहेत त्या कार्यक्रमात तेथील समितीचे अध्यक्ष संजय भला यांनी या सात दिवसाच्या कालावधीत आदिवासी संस्कृती परंपरा जतन होण्यासाठी व्याखने आयोजित करतो असे बोलताना सांगितले.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित आदिवासी हिरवा देव उस्तव समितीची अध्यक्ष संजय भला सल्लागार एकनाथ दरोडा,सचिव चंदर दोरे ,खजिन दार संतोष भला, उपअध्यक्ष नरेश दोरे,रवी सुतक,हरी दोरे,भगवान पागी,सारिका भला, शंकर पोकळे,अशोक पोकळे,हनुमंत भला ,केशव वारा ,संजय वारा उपस्थित होते.