निवेदिता महिला सहकारी संस्थेची वार्षिक साधारण सभा संपन्न 

अश्विन गोडबोले

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगाव र. नं १२०८ ची २२ वी वार्षिक साधारण सभा संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात रविवार १७ सप्टेंबर रोजी संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आमसभेला उपस्थित असलेल्या ५ महिला सभासदांच्या वतीने निवेदिताच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्वीप प्रज्वलन करून आमसभेला प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बाकरे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले व संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. संस्थेचे वसुली अधिकारी धनवंत लोधे यांनी संस्थेची आर्थिक पत्रके वाचून दाखविली. विषय सूचीनुसार सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा करून विषयांना मंजुरी देण्यात आली.

संस्थेच्या एकूण ठेवी १२४.६१ कोटी आहेत. संस्थेने अन्य बँकेत रुपये ३८.३९ कोटी गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये १.८९ कोटी असून स्वनिधी रुपये १७,३८,३०,२७३ आहे. अहवाल वर्षात संस्थेला रुपये १,५६,९९,५०५ नफा झालेला आहे. व संस्थेनी सभासदांना यावर्षी १५ टक्के लाभांष जाहीर केला आहे. नवरगाव, सिंदेवाही, वासेरा, गुंजेवाही, चिमूर, शेगांव (बू.), ब्रह्मपुरी, नेरी, वडसा (दे.) येथे संस्थेच्या शाखा आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘ अ ‘ असून संस्थेच्या वाढत्या विश्वासार्हतेमुळे ठेवीत वाढ होत आहे. विदर्भात अग्रणी महिला पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे.

संस्था प्रमुख दीपक जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या अंकेक्षण अहवालासंबंधी चर्चा केली तसेच आमसभेतील सर्व विषयांवर सभासदांशी चर्चा केली. संस्थेकडे उपलब्ध असलेल्या सर्व योजनांची माहिती दिली. प्रत्येक सभासदांनी आपले आवर्त ठेव खाते व मुदती ठेव खाते उघडण्यासंबंधी सूचना केली. संस्थेच्या उपाध्यक्षा प्रज्ञा दी. कवासे यांनी उपस्थित महिला सभासदांचे आभार मानले. आमसभेला सर्व संचालक मंडळ व बहुसंख्य महिला सभासद उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here