बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनमध्ये “अभियंता दिन” साजरा 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 20 सप्टेंबर:  सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या मल्टीपर्पझ सभागृहात भारतरत्न डॉं. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंती दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता करण्यात आले.

सर्वोदय महिला मंडळाचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, संस्थेच्या प्रेरणास्त्रोत यशोधरा बजाज, भारतरत्न डॉं. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे प्राचार्य सतीश ठोंबरे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये विविध विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शकांनी डॉं. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर भरत बजाज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतरत्न डॉं. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या कार्याचे महत्व भावी इंजिनीयर्स यांच्यासाठी कसे प्रेरणादायी आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे, ग्रिटिंग व ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली. त्यात 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ५८ विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच इलेक्ट्रीकल विभागातर्फे पोस्टर प्रेझेंनटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय इतरही वेगवेगळ्या स्पर्धांचे वेगवेगळ्या विभागामार्फत आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पि. आर. मालखेडे यांनी मानले तर सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा निल सी. बजाज व सचिव ममता बजाज यांनी सर्वाना इंजिनीयर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here