नागपुर पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

नागपूर पतंगाच्या नादात धावणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचा  रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. एन्टा विनोद सोळंकी (शिवकृष्णधामजवळ, वॉक्स कुलरच्या ब्रीजखाली, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे.

युवराज मेश्राम

नागपुर:- काटलेली पतंग पकडण्याच्या नादात 12 वर्षाचा मुलाचा रेल्वेला धडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. एन्टा विनोद सोलंकी असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एंटा पतंग पकडण्यासाठी रेल्वे मार्गावरून धावत होता. तेवढ्यात समोरून ट्रेन आली एन्टाला काही समजण्यापूर्वी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटा हा आपल्या आजीसोबत पुलाखाली उघड्यावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती. त्याचे खरे नाव कुणालाही माहिती नाही. त्याला एंटा म्हणूनच ओळखल्या जाते. तो गेल्या आठ दिवसांपासून आजीला पतंग विकत घेऊन मागत होता. मात्र, त्याच्या आजीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पतंग मिळाली नाही.

त्यामुळे तो रस्त्यावरील किंवा अडकलेल्या पतंग आणि तुटलेला मांजा जमा करून आपला शोक पूर्ण करीत होता. एंटा सोळंकी हा मंगळवारी सकाळपासूनच काटलेली पतंग जमा करीत होता. दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारात तो कटलेल्या पतंगाच्या मागे धावत होता. पतंगाकडे लक्ष ठेवत धावताना तो शिवकृष्णधाम झोपडपट्टीजवळील दिल्ली ते नागपूर रेल्वे लाइनवर गेला. या दरम्यान रेल्वे येत होती.

रेल्वेची जबर धडक एंटाला लागली. त्याच्या शरीराचे चेंदामेंदा झाला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. त्यांनी कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मेयोत रवाना केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here