मुलीचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत, साजरा बोर्डे परिवाराचे दान परिमिताचे पालन

52

मुलीचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धासोबत साजरा बोर्डे परिवाराचे दान परिमिताचे पालन

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक दैनिक मीडिया वार्ता 

मो – 8208166961

चिखली -: वर्षावास निमित्ताने दान परिमिता करणे बौद्ध धम्मात फार पुण्य समजल्या जाते म्हणून वर्षावासात आपली मुलगी कु अवनी अशित बोर्डे हिच्या वाढदिवसाच्या निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे किराणा, ब्ल्याकेट व फरसाण वाटप करून साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून भोकर चे उपसरपंच अनंता डोंगरदिवे तर विशेष उपस्थिती अशित अर्जुन बोर्डे, वैशाली अशित बोर्डे पवन खरात राजकुमार आराख राहुल गवई देवानंद काकडे अनिल फिरंगे पुजा अनिल फिरंगे हे होते.

वर्षावासात बौद्ध धम्मात दान परिमिता ला अत्यंत महत्व आहे तसेच आई वडिलांनी दिलेल्या शिकवणी नुसार त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्त इतरत्र खर्च न करता वृद्धाश्रमातील वृद्धाची मोफत निरंतर सेवा सुरु असलेल्या तुकारामबाबा आश्रय वृद्धाश्रमात एक महिना पुरेल असा किराणा ब्ल्याकेट व फरसाण वाटप करून साजरा करताना खूप आनंद वाटला मला वा माझ्या परिवारास या निराधार वृद्धाचा आशीर्वाद मिळवन्याचे भाग्य वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांच्यामुळे मिळाले यांनी सुरु केलेला वृद्ध प्रकल्पसोबत वर्ग 1 ते 10 पर्यन्त च्या विद्यार्थी ना मोफत शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थिना अभ्यासाची आवड निर्माण करून फार मोठे सामाजिक कार्य करीत आहे भविष्यात मी वा माझ्या बोर्डे परिवार, मित्र परिवार सर्वांकडून शक्य ती मदत नेहमी करीत राहू असे विचार अशित बोर्डे यांनी व्यक्त केले.

यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध सह गणेश डोंगरदिवे, द्वारका घेवंदे कावेरी डोंगरदिवे प्रियांका वानखडे अवचितराव डोंगरदिवे हे हजर होते सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार रुपाली डोंगरदिवे यांनी केले.