उप प्रादेशिक परिवहन मंडळ जळगाव यांना व्हाईस ऑफ मिडीयाचे पत्रकांराना ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पसाठी निवेदन

सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनिधी 

मो: 9561200938

यावल प्रतिनीधी – जळगाव जिल्हयातील व्हाईस ऑफ मिडिया द्वारे पत्रकारांसाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्याबाबत जिल्हा परिवहन अधिकारी यांना व्हॉइस ऑफ मीडिया मुस्लिम विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरीफ बागवान यांनी निवेदन दिले तसेच निवेदनात म्हटले आहे की, वाईस ऑफ मीडिया भारतातील पत्रकारांसाठी मोठी संघटना आहे पत्रकारांच्या हक्क अधिकाऱ्यांसाठी लढा देणारी तसेच त्यांच्या हितासाठी सुख सुविधा उपलब्ध करण्यास पुढाकार घेणारी संघटना आहे. पत्रकार हा शासनाचा चौथा स्तंभ आहे व वृत संकलनासाठी टू व्हीलर फोर व्हीलर वर फिरावे लागत असते त्यामुळे, लायसन्स जवळ असणे हे कायदेशीर बंधनकारक आहे, या करीता कोणत्याही पत्रकाराला त्रास होऊ नये विशेष म्हणजे,लायसन नसल्यास कायदेशीर दंड भरावा लागतो, कारवाई करताना वेळ वाया जातो,यासाठी प्रत्येकाने लायसन्स सोबत घेऊन राहावे म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया याबाबत कॅम्प आयोजित करीत आहे.

म्हणून समाजात वावरताना आपले अधिकाराचे रक्षण आपल्याला करता आले पाहिजे म्हणून जळगाव जिल्हयातील संघटनेशी जुळलेले व इतर सर्व पत्रकारांचे टू व्हीलर, फोर व्हीलर लर्निंग लायसन्स नियमानुसार शासकीय फी भरून कॅम्प घेण्यात येत आहे.  

        तरी त्यामध्ये आरटीओ विभागाचे मार्गदर्शन व मदत सहकार्य मिळणार आहे,ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स जागेवरती देण्यात येणार असुन जिल्ह्यातील गरजू पत्रकारांनी सघटनेच्या पदधिकारीशी संपर्क साधावा व यादी तयार झाल्यानंतर आपल्याला तारीख दिली जाईल त्या दिवशी कॅम्प मध्ये सर्वांना बोलून लायसन्स बनवले जातील जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कॅम्प आयोजित केलेल्या लर्निंग लैम्पद्वारे लायसन्स साठी नाव नोंदणी गरजेची आहे.संपर्क ९२०९२५५७८६ वर तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या चे वाईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष शी संपर्क करावा अशी पत्रकाद्वारे कळविले आहे .

ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्या संदर्भात जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना आशयाचे निवेदन डॉ.शरीफ बागवान राष्ट्रीयअध्यक्ष वाईस ऑफ मीडिया मुस्लीम विंग यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here