यावल तालुक्यातील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीत घोळ, विविध संघटनांचे निवेदन

58

यावल तालुक्यातील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीत घोळ वेगवेगळ्या संघटनेचे निवेदन

✒️सुपडू संदानशिव✒️

यावल तालुका प्रतिनिधी

📱9561200938📱

 यावल- तालुक्यातील शिक्षण विभागाचा प्रकार जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगर कठोरा येथील आदिवासी समाजाचे प्राथमिक शिक्षक श्री.इस्माईल जहान तडवी यांना सेवाजेष्ठता यादीत वगळून दुसऱ्या शिक्षकाचे नाव सेवा जेष्ठता मध्ये घेण्यात आले या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी यांनी या प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचे आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या संघटनेच्या माध्यमातून निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव, गटविकास अधिकारी यावल, गटशिक्षण अधिकारी यावल, यांना निवेदन सादर करून या अतिरिक्त शिक्षक समायोजन यादीची सेवा पुस्तका नुसार तात्काळ चौकशी करावी व अन्याय झालेल्या शिक्षकांना सेवा जेष्ठता यादी मध्ये घेण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगरकठोरा येथील प्राथमिक शिक्षक इस्माईल जहान तडवी यांना जाणून-बुजून सेवा जेष्ठता यादी मध्ये घेतले नसल्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत1989 नुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगर कोठारा येथील प्राथमिक शिक्षक इस्माईल जहान तडवी यांनी एक महिन्यापासून यांना तक्रार अर्ज केलेला असून सुद्धा त्यांच्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल गट विकास अधिकारी यांनी घेतली नाही समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीवर 14 तारीख ला हरकत घेतल्यावर सुद्धा सय्यद आदिल हुसेन हिफाजत अली यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने तीन तीन महिन्याचा खंड असून सुद्धा हे शिक्षक सेवा जेष्ठ यादीमध्ये येत नसल्यावर सुद्धा गटशिक्षणाधिकारी व कार्यालयीन अधीक्षक व त्यांचे सहकारी यांनी आर्थिक व्यवहार करून या याद्यांमध्ये घोळ केलेला आहे या यावल तालुक्यातील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादी मध्ये चांगलाच भ्रष्टाचार केल्याचे निवेदनात म्हटले आहे या प्रकरणाची तात्काळ माननीय जिल्हा अधिकारी साहेब व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन चौकशी करावी येत्या पंधरा दिवसात या यादीची चौकशी न झाल्यास आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच जिल्हाध्यक्ष सलीम छबु तडवी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या समायोजन अतिरिक्त शिक्षकांच्या यादीवर तात्काळ दखल घेण्यात येऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ पारधे यांनी गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन तसेच आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच यांनी माननीय वरिष्ठ संशोधन अधिकारी सौ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग वरळी यांना सुद्धा ई-मेल पाठवलेला आहे

 निवेदन सादर करताना रब्बील तडवी जिल्हा संघटक यावल तालुका अध्यक्ष अश्फाक छबु तडवी कार्याध्यक्ष फिरोज कडवी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमित तडवी तालुका सचिव पत्रकार जुम्मा तडवी शाखाध्यक्ष फिरोज तडवी यांनी सुद्धा निवेदन सादर केलेले आहे.