यावल महाविद्यालयात G20 राष्ट्र गट या विषयावर व्याख्यान

49
यावल महाविद्यालयात G20 राष्ट्र गट या विषयावर व्याख्यान

यावल महाविद्यालयात G20 राष्ट्र गट या विषयावर व्याख्यान

यावल महाविद्यालयात G20 राष्ट्र गट या विषयावर व्याख्यान

✒️सुपडू संदानशिव✒️
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱

यावल – येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमांतर्गत G20 राष्ट्र या विषयावर व्याख्यान झाले.
यावल महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या अध्ययस्थानी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार होते. यावेळी प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांनी त्यांच्या व्याख्याना मध्ये G20 म्हणजे Group of 20 हा जगातील प्रमुख विकसीत व विकसनशील देशांचा राष्ट्र गट आहे. याचे प्रमुख उदिष्ट म्हणजे धोरण समन्वयाद्वारे जागतीक आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे आहे. G20 देशांच्या विविध गटांना एकत्रितपणे जागतिक अर्थव्यवस्थेच्या महत्वपूर्ण भागाचे, प्रतिनिधीत्व करतात असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. एम.डी खैरनार मार्गदर्शन करतांना म्हणाले कि विकसित देश,विकसनशील देश, यांच्यातील आर्थिक विषमता, पर्यावरण ऱ्हास, गरिबी निर्मूलन यावर उपाययोजना सुचवणे हा G 20 चा मुख्य उद्देश आहे असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.अक्षय सपकाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.ए.पी पाटील यांनी तर आभार नरेंद्र पाटील यांनी केले. व्याख्यानाला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.