संविधानाचं मागणं…

52
संविधानाचं मागणं...

संविधानाचं मागणं…संविधानाचं मागणं...

उठ मतदार जागा हो
सत्तेत तू सहभागी हो
तुझे प्रश्न तूच आता
माडंण्यास योग्य हो

न्यायाची तू कास धर
अन्यायावर मात कर
व्यवस्थेचे तोडून श्रृंखले
जुल्मावर आघात कर

उन वारा पाऊस पाणी
तुफानाची पर्वा नको
धगधगत्या आग्नीला
भावनेचा गारवा नको

संयमाचा बांध फुटू दे
क्रांतीचे वादळ उठू दे
इतिहासाच्या पानावर
कतृत्वाचा ठसा उमटू दे

काम नाही दाम नाही
बेकारीने छळले तुला
आयुष्याच्या वाटेवर
यश नाही मिळले तुला

भांडवलदाराचे दिस खास
शेतकर्‍याच्या गळी फास
सोडाणार कधी गड्या
येणार अच्छे दिन की आस

मताला तुझ्या भाव नाही
नेतृत्वालाही वाव नाही
राजकारणाच्या पटलावर
लोकशाहीचं नाव नाही

कुठवर जगशील गड्या
हे लाचारीचं जगणं
जागू दे स्वाभिमान तुझा
हेच संविधानाचं मागणं

*कवी- मारुती खुडे गुरुजी.*
*श्रीक्षेत्र माहुर. जि.नांदेड*
*मो.9809325050*