गणपतीबाप्पा बाबत आक्षेपार्ह टिप्पणी सार्वजनिक केल्या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल.

48

✍🏻 गोपाल नाईक ✍🏻
नांदेड जिल्हा प्रतिनिधी…
मो.7499854591.

नांदेड : जिल्हयातील माहूर तालुक्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेवर शिक्षक या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर पाटील कराळे यांनी गणपती बाप्पा विषयी दुसऱ्याची आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यमात टाकली. त्यामुळे हिंदू धार्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने त्यांचेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करणारी तक्रार गजानन राजु चव्हाण रा. माहूर यांनी केल्याने माहूर पोलिसांनी दि.22 सप्टें. रोजी कराळे पाटील यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 505(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गणपती बाप्पाची विटंबना होईल असा डॉ. प्रदीप पाटील यांचा आक्षेपार्ह लेख शिक्षक असलेल्या ज्ञानेश्वर कराळे पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकला.तशी टिपण्णी पाहताच उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख निरधारी जाधव व महंत ज्ञानेश्वर भारती महाराज यांनी शेकडो गणेश भक्तांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठून सार्वजनिक शांतता बिगडवण्याचा उठाठेव करणाऱ्या ज्ञानेश्वर कराळे पाटील याचेवर कायदेशीर करावी अशी मागणी केली. त्यानुसार गजानन चव्हाण यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर हे पुढील तपास करीत आहेत.