सहारा इंडस्ट्रीज अँड कंट्रक्शनच्या ठेकेदाराकडून महागावात घनकचरा सफाईला दिरंगाई

55

सहारा इंडस्ट्रीज अँड कंट्रक्शनच्या ठेकेदाराकडून महागावात घनकचरा सफाईला दिरंगाई, नगरपंचायत उपाध्यक्ष कडे केली वंचित बहुजन आघाडीने तक्रार

yavtmal-district-news-update

सिध्दार्थ दिवेकर

यवतमाळ प्रतिनिधी

मो.9823995466

महागाव (दि. 23 सप्टेंबर) शहरातील 17 ही प्रभागाच्या घनकचरा स्वच्छते विषयी एका कामगार कंपनी ला ठेका देण्यात आला.

सदर ठेकेदाराची घनकचरा स्वच्छते विषयी कमालीची उदासीनता दिसून येते. येथे अनेक ठिकाणी गंधगी फैलावत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गेल्या पंधरवड्यापासून ठेकेदाराचे प्रभाग क्रमांक तीन मध्ये दुर्लक्ष होत आहे.

अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपंचायत कडे तक्रार सादर करण्यात आली.महागाव शहराच्या घनकचरा निर्मूलनाचे काम सहारा इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या गायकवाड नामक ठेकेदारास 72 लाखाचा घनकचरा विल्हेवाट लावण्याचा ठेका मिळाला आहे.

महागाव शहरांमध्ये अनेक प्रभागात स्वच्छते विषयी संबंधित ठेकेदाराकडून योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. प्रभाग क्र. ०३ हा सन्माननीय नगराध्यक्षांचा विजयाचा बालेकिल्ला आहे.

 त्यामुळे या प्रभागातील रहिवाशांच्या त्यांच्याकडून स्वच्छते विषयी मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु संबंधित ठेकेदाराकडून कामचुकारपणा होत आहे. रोजंदारीवर असलेल्या कामगारांना नियमित पगार पाणी मिळत नसल्याचे कळते. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या गाळ साचल्याने तुडुंब भरल्या आहेत.

 शौचालयाचे मलमूत्र योग्य पद्धतीने विल्हेवाट न होता गंदगी फैलावत आहे. महागाव शहराच्या १७ ही प्रभागासाठी सहारा इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीस च्या गायकवाड नामक ठेकेदारास बहात्तर लाखाचा घनकचरा सफाईचा ठेका देण्यात आला खरा परंतु सदर ठेकेदार हा योग्य नियोजन न लावता बचतीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. स्वच्छता अभियानाअंतर्गत महागाव शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी शासनाचा लाखो रुपयाचा या कंत्राटावर खर्च होत आहे.

सदर ठेकेदार उंटावरून शेळ्या हाकत असल्याची दिसते. शहरातीलच एका डमी ठेकेदारा करवी काम करून घेतल्या जाते. या ठिकाणी नगरपंचायत मार्फत घनकचरा वाहने नादुरुस्त अवस्थेत इतरत्र उभी आहेत.

सहा घंटागाड्या पैकी दोनच कार्यरत आहेत. बाकी नव्याने दोन घंटा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु त्या ठेकेदारास हस्तांतरित झाल्या नसल्याचे दिसते.

या भागातील घनकचरा स्वच्छतेविषयी नगरपंचायतने संबंधित ठेकेदारास तशा प्रकारची तंबी देऊन नागरिकांचे आरोग्याची बिघडू नये म्हणून वेळीच स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे यशवंत कावळे यांनी नगर पंचायत उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांच्याकडे सादर केले आहे.