अलिबाग-वावे रस्त्यावर खड्यांचा प्रश्न गंभीर, वाहतूक कोंडीचा फटका

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीमध्ये प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारे साहित्यांची वाहतूक अवजड वाहनांतून केली जात आहे. मात्र गेल कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर अलिबाग-वावे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयात शुक्रवारी एक अवजड वाहन अडकले. त्यामुळे गेली कित्येक तास ते वाहन खड्ड्यात उभे राहिल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या अवजड वाहनांचा अडथळा निर्माण झाला. त्यात काही वेळा वाहतूक कोंडीला फटकादेखील बसल्याचे दिसून आले.

उसर येथील गेल कंपनीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम गेल्या अकरा महिन्यांपासून सुरु आहे. आतापर्यंत 40 टक्के काम झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकल्पाच्या कामांसाठी लागणाऱ्या मशनरी अवजड वाहनांद्वारे कंपनीत आणल्या जात आहेत. शुक्रवारी सकाळी अवजड वाहनांमधून एक यंत्र कंपनीत घेऊन जात असताना अलिबाग-वावे रस्त्यावरील गेल कंपनीच्या प्रवेशद्वारा समोरच असलेल्या खड्ड्यात अवजड वाहन सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अडकले. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात अवजड वाहन अडकल्याने कित्येक तास वाहन रस्त्यातच उभे राहिले. त्यामुळे अलिबाग- वावे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अवजड वाहनांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.

अन्य वाहन चालकांना त्यावेळी वाहने सावकाश चालिवण्याची वेळ आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करण्यास प्रशासन उदासीन ठरले. या खड्ड्यातून अन्य वाहनांना वाहुन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here