गणरायाला निरोप देताना डीजे व गुलाल मुक्त निरोप द्यावा, माहूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. नितिन कशिकार यांचे नागरिकांना आवाहन…

49

गणरायाला निरोप देताना डीजे व गुलाल मुक्त निरोप द्यावा, माहूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. नितिन कशिकार यांचे नागरिकांना आवाहन…

गोपाल नाईक

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

मो.7499854591

नांदेड : गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवसी गणेशाला निरोप देताना सरास गुलालाची उधळण केली जाते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून लाडक्या गणेश:ला निरोप देतांना भक्तांनी गुलाल उजळणे टाळावे,कारण गुलालात कचखडीचे बारीक कण व केमिकल असतात ते कान, डोळे, नाक, तोंडात गेल्यावर घातक ठरु शकतो. शिवाय याच गुलालामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतात हे सर्व टाळण्यासाठी माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेशभक्तांनी व गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या उधळाव्यात असे आवाहन माहूर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्ष डॉ. नितिन काशीकर यांनी केले आहे. 

कोरोना नंतर यंदा अतिवृष्टीने गणेश उत्सवार दुष्काळाचे सावट आले असून यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले. मात्र आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देतांना माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश भक्तांनी गुलाला आयोजी फुले उधळून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यावा तसेच मिरवणुकीत डीजे आयोजी पारंपरिक वाद्ये वाजवावेत विसर्जन मिरवणुकीत विघ्नसंतोषी लोकांन पासून सावध रहावे, कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी गणेश मंडळाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करून यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि गुलालमुक्त करावा आसे आवाहन माहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक डॉ. काशिकर यांनी केले आहे.