उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सफाई कामगाराचा गौरव.
कळमना येथे सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा दि. २५ सप्टेंबर:– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वच्छ भारत मिशन, स्वच्छता हि सेवा अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाबतचा सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्यांच्या कामापासून अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी स्वच्छता ही सेवा अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा दिवसांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी नथथु वसाके, समाधान पेटकर या दोघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कळमनाचे उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गाव स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. स्वच्छता ही च खरी ईश्वर सेवा आहे. आणि हे अतिशय महत्वाचे काम करणाऱ्यांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. यामुळे स्वच्छतेच्या कार्याला गती येईल व गावाच्या विकासाला चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील, कौशल्य कावळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे ,सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे ,श्रावण गेडाम, आशा वर्कर कल्पना क्षिरसागर, संगीता उमाटे ,शंकर गेडाम, मारोती आत्राम, शामराव चापले, लक्ष्मण आत्राम,जैराम गेडाम, पुंडलिक मेश्राम, देवानंद आस्वले, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे ,व समस्त गावकरी उपस्थित होते.