पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले

60
पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले

पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले

पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो
9096817953

नागपूर.नागपुरात शनिवारी झालेल्या ढगफुटीमुळे दत्तवाडी परिसरातील नाग नदी काठावरील शेकडो रहिवासी नागरिकांच्या घरात नागरीक साखर झोपेत असताना एकाएकीच नदीच्या पुराचे पाणी शिरले. यामुळे त्यांच्या जिवनोपयोगी वस्तुंचे अतोनात नुकसान झाले आहे.गहू, तांदुळ, दाळ, कडधान्ये, मसाले, भाजीपाला, साखर, मिठ आदी जिवनोपयोगी वस्तूंसह दुचाकी-चारचाकी वाहने, अंथरुण- पांघरुण, टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, गॅस शेगडी व पाणी काढण्याच्या मशीनी पाण्याखाली आल्यामुळे सर्व साहित्याची नासधूस होऊन खराब झाले.

सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाला तातडीची मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी हाक दिली. प्रशासनाने सुद्धा याची गंभीर दखल घेत रविवारी सुट्टीच्या दिवशीसुध्दा नागरीकांच्या झालेल्या नुकसानाबद्दल पंचनामे करुन घेतले. तलाठी झाडे, संकेत बांबोळे, शिवरकर, रुतिका खंडाते, कोतवाल रवि फाले, वाडी नगर परीषदेचे कर्मचारी, भिमराव जासुतकर, अशोक जाधव, कमलाकर तिजारे, भारत ढोके, मनोहर वानखेडे, यांचे सोबत शिवसेनाशहर प्रमुख मधु माणके पाटील यांनी रामकृष्ण नगर, सत्यसाई सोसायटी, गजानन सोसायटी,ओम साई सेवा भावी सोसायटी, मंगलधाम सोसायटी, सुरक्षा नगर, शुभारंभ सोसायटी, सत्यसाई बाबा नगर, विठ्ठल वाडी, ज्ञानेश्वर नगर आदी नदीतीरावर असलेल्या पूरग्रस्त वस्त्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम आज उशिरापर्यंत सुरु होते. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुरग्रस्तांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई दयावी असे आव्हान शिवसेना वाडी शहर प्रमुख मधु माणके पाटील यांनी प्रशासनाला केले आहे.