माणगांव पुणे हायवे क्रमांक 66 वर ऍक्टिवा स्कुटीचा अपघात अपघातात एक ठार…

54

माणगांव पुणे हायवे क्रमांक 66 वर ऍक्टिवा स्कुटीचा अपघात अपघातात एक ठार…

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यातील मौजे निजामपूर ते भाले मार्गांवर आरोपी गोपीनाथ गणपत मोरे वय वर्ष ३७ रा. भाले ता. माणगांव व मयत इसम राजाराम शंकर मोरे वय वर्ष ५२ हे दोघेही रा. भाले ता माणगांव हे निजामपूर ते भाले असं प्रवास करीत असताना आरोपी गोपीनाथ मोरे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच अतिवेगाने हयगयीने बेदकरपणे गाडी चालवून अपघात केला त्यात ते दोघे खाली पडल्याने मागे बसलेले राजाराम मोरे यांच्या डोक्यास दुखापत होऊन मरण पावला.

 

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की आरोपी गोपीनाथ मोरे हे आपल्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच ०६ सी एफ.८८८६ हे निजामपूर वरून भाले बाजूकडे अतिवेगाने चालवीत जात असताना हा अपघात घडला यांच्यामध्ये त्याच्या पाठीमागे बसलेले राजाराम मोरे यांना मोठया प्रमाणात दुखापत होऊन त्याच मृत्यू झालं यां घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस नाईक फडताडे व पोलीस हवालदार तुणतुने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपी गोपीनाथ मोरे यांच्या विरोधात कॉ. गु. रजि. नं ३०४/२०२३ भा. द. वि. सं. कलम ३०४ अ,२७९,३३७,३३८ मो. वा. कां. कलम १८४ प्रमाणे माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.