बंद पथदिवे शोभेच्या वस्तू आहेत का ?

    जेथे घर आहे तेथे उजेड असावा, जेथे गाव आहे त्या गावात उजेड असावा पण, ज्या गावात पथदिवे लावलेले असून सुद्धा ते नेहमीच बंद राहत असतील तर त्या गावात राहणाऱ्या लोकांनी अंधारात राहून किती दिवस काढावे…? म्हणजेच त्यांच्या जीवनातील हि एक प्रकारची नवीन समस्या निर्माण झाली म्हणायला काहीच हरकत नाही तसेही ते, अनेक अडी, अडचणींचा सामना नेहमीच करत असतात तशीच पुन्हा हि एक प्रकारची नवीन अडचण त्यांच्या जीवनात बघायला मिळत असते. ह्या अशा अडचणींचा सुद्धा त्यांना नेहमीच सामाना करावे लागते बऱ्याच गावामध्ये पथदिवे लावलेले असतात पण ते नेहमीच बंद असलेले दिसून येतात. सध्याच्या घडीला सण, उत्सवाचे दिवस सुरू आहेत तरीही सुद्धा काही गावात अजूनही अंधार आहे मग त्यांच्या जीवनात उजेड कधी यावा हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. 

    बरेचदा वृतपत्राच्या माध्यमातून गावखेड्यात बंद असलेले पथदिवे या विषयी बातम्या वाचायला मिळत असतात हे, कोणापासूनही लपलेले नाही, तरीही सुद्धा त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही. म्हणून लावलेले बंद पथदिवे आज शोभेची वस्तू बणताना दिसत आहेत. सोबत शेतीला ही वीजपुरवठा पूर्णपणे मिळत नाही, घरगुती वीज पुरवठा सुध्दा कमी मिळत असते, पण विजेचा बिल मात्र गगणाला जाऊन भिडलेला दिसून येतो या प्रकारची अडचण पाहून गोरगरीबांनी काय करावे…? बंद पथदिवे असलेल्या गावामध्ये जर अंधारच राहत असेल तर त्या गावाचा पूर्णपणे विकास झाला म्हणता येणार नाही कारण, बंद पथदिवे असतांना पाहून त्यातून नको त्या घटना घडू शकतात, काही प्रसंग न कळताच येऊ शकतात तसेच वनप्राण्यांची वाटचाल आजकाल गावाकडे होतांना दिसत आहे. कधी, काळी सांगता येत नाही की,वनप्राणी अंधाराचा फायदा घेऊन रात्रभर गावात राहिले आणि नुकसान करून निघून गेले तरी कोणालाही कळणार नाही. याच अंधाराचा फायदा घेऊन काहीही होऊ शकते. त्याच प्रमाणे समाजात एक प्रचलित म्हण आहे ती,म्हणजेच ज्याचं जळतं त्यानाचं कळतं व सहनही त्यांनाच करावे लागते मग अशा शोभेची वस्तू बणलेल्या बंद पथदिव्यांचा काय उपयोग. ..? जर ते पथदिवे उपयोगी पडत नसतील तर त्यांनी उजेडाची प्रतिक्षा कोणाकडून करावे . .?

गावात राहणारे लोक अशा अनेक अडचणींना नेहमीच सामना करत असतात.बंद पथदिव्यामुळे संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागतो तरीही त्यांना होणारा त्रास व अडचणी कोणालाही दिसत नाही. त्यामुळे अनेक जण ह्या होणाऱ्या त्रासाला वैतागुन गेले आहेत. नेहमीच बंद असलेले पथदिवे हि एक प्रकारची चिंताजनक बाब आहे ज्या प्रमाणे उभारलेले मोठे,मोठे टॉवर असतात पण,नेटवर्क नेहमी बंद असते त्याप्रमाणेच हे, बंद असलेले पथदिवे शेवटी शोभेची वस्तू बणत आहेत. आज ह्या बंद पथदिव्यांमुळे वाढत असलेल्या अडचणी संकटांना आमंत्रण देत आहेत.

     म्हणून असे पुढे होऊ नये यासाठी बंद असलेले पथदिवे सुरु होणे काळाची गरज आहे व तेथे राहणाऱ्या लोकांना ह्या त्रासापासून सुटका होण्यासाठी व त्यांच्या मनात इतर गोष्टींविषयी जी भीती निर्माण झालेली बघायला मिळत आहे ती, भीती दूर घालविण्यासाठी त्वरीत बंद पथदिवे सुरु करावे. कारण गावातही माणसेच राहतात ज्याप्रमाणे शहरात माणसे राहतात, शहरात जिकडे, तिकडे उजेडाची सोय दिसत असते तशीच सोय गावात सुद्धा होणे गरजेचे आहे.

बंद असलेले पथदिवे सुरु करून पुन्हा एकदा गावात उजेड आणण्यासाठी प्रयत्न करावे कारण‌ गावातील लोक आजही उजेडाच्या प्रतीक्षेत वाट बघत आहेत. 

सौ.संगीता संतोष ठलाल

 मु.कुरखेडा जि.गडचिरोली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here