प्रत्येक वाढदिवस हा समाजाच्या हितासाठी असावा:- आमदार संग्राम थोपटे -अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टचे उद्घाटन

53

प्रत्येक वाढदिवस हा समाजाच्या हितासाठी असावा:- आमदार संग्राम थोपटे -अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टचे उद्घाटन

चंद्रकांत जाधव

भोर प्रतिनिधी 

        आपण समाजात वावरत असताना समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने आपले वाढदिवस समाजाच्या हितासाठी साजरे करावेत असे मत भोर, वेल्हे ,मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.

     मंगळवार (दि.२६)रोजी आरोग्यवर्धिनी स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोर येथे अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली त्या उद्घाटन प्रसंगी आमदार थोपटे बोलत होते. यावेळी मोफत महा आरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण या शिबिरात सहभागी झाले होते .यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी सभापती लहूनाना शेलार ,धनंजय वाडकर ,पंढरीनाथ भिलारे, अनिल सावले, उत्तम थोपटे, प्रा.डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, गीतांजली शेटे, गीतांजली अंबवले, सुवर्णा मळेकर, डॉ.ओंकार थोपटे, डॉ अरुण बुरांडे, डॉ अण्णासाहेब बिराजदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले डोंगरी दुर्गम भागातील रुग्णांना आर्थिक समस्याला तोंड द्यावे लागते त्यामुळे त्याला उपचार घेता येत नाही. महिलांची ही समस्या हीच असल्याने ती आरोग्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी व वेळेत उपचार औषधे मिळण्यासाठी अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टची निर्मिती होत आहे आरोग्यासह या ट्रस्टच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगून ते पुढे म्हणाले विज्ञान प्रगत झाले असेल तरी ग्रामीण भागात याचा फारसा उपयोग दिसून येत नाही त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्ट नेहमीच कार्यरत असेल असे आमदार थोपटे यांनी सांगितले.

         भव्य मोफत महा आरोग्य शिबीर तालुक्यातून मोठ्या संख्येने रुग्ण आले असता उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या यासाठी डॉ.डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी ,आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल थेरगाव ,लोकमान्य कॅन्सर हॉस्पिटल चिंचवड, मिशन फॉर व्हिजन फाउंडेशन पुणे, पृथ्वीराज थोपटे युवा मंच भोर, वेल्हे ,मुळशी व पंचायत समिती आरोग्य विभाग भोर उपजिल्हा रुग्णालय भोर यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.