साखर कारखानदारी अडचणीत असतानाही राजगड साखर कारखाना सुरू राहणार – आमदार थोपटे

54

साखर कारखानदारी अडचणीत असतानाही राजगड साखर कारखाना सुरू राहणार – आमदार थोपटे

चंद्रकांत जाधव

भोर प्रतिनिधी

      राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असताना राजगड साखर कारखान्याचे वाटचाल सभासद ,हितचिंतक ,कामगार यांच्या सहकार्यातून सुरू असताना काही मंडळी राजकीय हेतूने कारखान्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे असतानाही या गळीत हंगामात राजगड साखर कारखाना सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

        अनंतनगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी(दि.२६)रोजी कारखाना कार्यक्षेत्रात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे बोलत होते यावेळी उपाध्यक्ष पोपट सुके, विकास कोंडे,के.डी.सोनवणे,शिवाजी कोंडे,शैलेश सोनवणे,शोभा जाधव,दिनकर धरपाळे,सुधीर खोपडे,सुभाष कोंढाळकर,,प्रताप शिळीमकर,उत्तम थोपटे,संदीप नगिने,आबासाहेब यादव,नाना राऊत, दिनकर सरपाले,अमोल नलावडे,चंद्रकांत शेडकर,बाळासाहेब थोपटे आनंद आंबवले,धनंजय वाडकर,सोमनाथ सोमानी,दत्ताञय चव्हाण, सुरेखा निगडे,आबा शेलार,संपत आंबवले,सतिष चव्हाण, खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, संचालक संपत दरेकर, राज तनपुरे,शेतकरी, सभासद उपस्थित होते.  

        यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की शेअर्सच्या भागभांडवलाची खरेदी केली. त्यात भाग भांडवल वाढवले आहे.बिगर उस उत्पादकांचे वाढीव शेअर्स रक्कम अदयाप दिलेली नाही.ते मिळावेत म्हणून प्रयत्न सुरु असुन मशिनरी जुनी असल्याने गाळप कमी झाले. गाळपाला येणार ऊसही कमी आला. त्यामुळे २ लाख मे टन गाळपाचे उदिष्ट असताना ५५ हजार मे टनच गाळप झाल्याने उदिष्ट पुर्ण न झाल्याने कारखाना तोटयात गेला.माञ यावर्षीचा कर्जाचा अहवाल साखर आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे. ८% दराने लवकरच त्याला मंजूरी मिळेल.त्या पेमेंट मधून शेतकरी यांच्या मगिल तीन चार महिन्याचा हप्ता दिला जाईल. मगिल वर्षाच्या गळपाचा २३०० च्या वरचा हप्ता कारखाना देणार आहे.तर कामगारांचे अनेक महिन्याच्या पगाराचे देणे आहे ते दिले जाईल.कारखान्याची गाळप क्षमता १२०० वरुन ३ हजार मे टन करण्याचा निर्णय संचालक मंडळ घेतला आहे.

         मशिनरी मेंन्टन्स करणे,कामगार शेतकरी यांचे देणे,ऊस टोळया नियोजन करण्यात येईल. कारखान्याचा माल, स्क्रॅप विक्रीला साखर आयुक्त यांची मंजूरी घेऊन माल विक्री करायची आहे.माञ कारखान्याचे कामकाज बंद असल्यामुळे सभा होती. कि नाही अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या.माञ मी मैदान सोडुन पळुन जाणारा नाही.राजगड कारखाना तालुक्याचा स्वाभिमान असुन कितीही अडचणी आल्या तरी राजगडचा गळीत हंगाम नोव्हेंबरला सुरु करणार माञ राजगड साखर कारखान्याबदल कोणीही राजकारण करत असेल ते खपवुन घेतले जाणार नाही. असा इशारा आ.थोपटे यांनी दिला.प्रस्ताविकात कार्यकारी संचालक सुनिल महिंद यांनी सभेपुढे ८ विषय ठेवण्यात आले होते. त्या सर्व विषयाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तर आभार पोपट सुके यांनी मानले.