ईद-ए-मिलाद या सणाची सार्वजनिक सुट्टी गुरुवारी 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
कोकण :-* राज्य शासनाने आणि रिझर्व बॅंकेने उद्या गुरुवार, दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी असणारी सुट्टी शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केल्याने या दिवशी शासकीय कार्यालये आणि बॅंका सुरु राहणार आहेत.सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रो.दि.कदम-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात.
यावेळी जुलूस कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. तथापि, या वर्षी गुरुवार, दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुदर्शी हा सण आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची मोठी मिरवणूक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार,दि.28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बॅंकेचे महाप्रबंधक आर. सुदीप यांनीही याबाबत परिपत्रक प्रसिध्दीस दिले असून, उद्या गुरुवार, दि. 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि.29 सप्टेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे