पुरामुळे पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आणि नदीत कोसळला. तेव्हापासून पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

57

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9096817953

नागपूर : नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशात पंचशील चौक येथे नाग नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला होता. आता या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

पुलाचा बांधकामासाठी जवळपास 6 कोटी खर्चाचा अंदाज असून, या कार्यास किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली.

पंचशील चौक ते झाशी राणी चौक या दरम्यान नाग नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. ज्याची 1974 साली रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवरफ्लो झाल्याने नाग नदीला पूर आला आणि या पुरामुळे पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आणि नदीत कोसळला. तेव्हापासून पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सध्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद असून, हलक्या वाहनांसाठी वाहतूक खुली करण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुलाची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागाला सिमेंटच्या काठ्यांनी बंद करण्यात येऊन काही भाग वाहतुकीस खुला करण्याची शक्यता पडताळणी करण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.