नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जनहितार्थ सूचना निर्गमित • बि. एन. माहोरे सह दुय्यम निबंधक, वर्ग- 2, चंद्रपूर यांचे नागरिकांना आवाहन

58
नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जनहितार्थ सूचना निर्गमित • बि. एन. माहोरे सह दुय्यम निबंधक, वर्ग- 2, चंद्रपूर यांचे नागरिकांना आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जनहितार्थ सूचना निर्गमित

• बि. एन. माहोरे सह दुय्यम निबंधक, वर्ग- 2, चंद्रपूर यांचे नागरिकांना आवाहन

नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जनहितार्थ सूचना निर्गमित • बि. एन. माहोरे सह दुय्यम निबंधक, वर्ग- 2, चंद्रपूर यांचे नागरिकांना आवाहन

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 30 सप्टेंबर
स्थावर मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहारात बनावट
व्यक्तीव्दारे खोटी कागदपत्रे तयार करुन दस्तऐवज नोंदणी केल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची अश्याप्रकरे फसवणुक होवू नये, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सर्व जनतेनी मिळकतीचे व्यवहार करतांना कुठली दक्षता घ्यावी. याबद्दल माहिती देऊन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील नोंदणी कार्यालयात मिळकतीचे खरेदी- विक्रीचे दस्ताची नोंदणी केल्या जाते. सद्यस्थितीत जागेचे भाव वाढलेले आहेत. तसेच दिवसेंदिवस ते वाढतच आहेत. त्यामुळे बरीच लोकं आपली रक्कम मालमत्ता घेऊन त्यात गुंतवत आहेत. कमी वेळात जास्त फायदा देणारी गुंतवणुक म्हणुन जमिनीच्या खरेदी विक्री व्यवसायाकडे बघितल्या जाते. त्यामुळेच शहरा लगतच्या भागात झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुर्नविक्रीच्या व्यवहारात सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यस्थ अथवा दलाल यांचे मार्फत मिळकत विकत घेण्याचे प्रमाण वाढिस लागले आहे. अनेक ठिकाणी बोगस व्यक्ती उभी करून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार उघडकीस येत असतात. नोंदणी विभागाद्वारें वेळोवेळी गुन्हे सुध्दा दाखल करण्यात येतात. परंतु भविष्यात सर्वसामान्य जनतेची फसवणुक होवु नये यासाठी जनतेत जनजागृती होणे आवश्यक आहे. ही जागृती व्हावी व ग्राहकांची फसवणूक टाळल्या जावी यासाठी ह्या सुचना प्रदर्शित केल्या आहे. जनतेनी या सुचनांचे पालन केल्यास त्यांची फसवणुक होणार नाही. म्हणुन यावर जनतेनी अमल करावा असे आवाहन बि. एन. माहोरे सह दुय्यम निबंधक, वर्ग- 2, चंद्रपूर यांच्यातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
दस्त नोंदणी प्रकियेमध्ये तोतयेगिरी करणे,
खोट्या नावाने कबुली जवाब देणे, तोतया व्यक्तीची खरी व्यक्ती म्हणून ओळख पटविणे,.बनावट कागपत्रांचा वापर करणे, बनावटीकरणात सहाय्य करणे या सगळ्या गैरप्रकारांसाठी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये ७ वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे.
प्रत्येक नोंदणी कार्यालयाबाहेर सुचना फलक प्रदर्शित केले आहेत. याद्वारे जनतेची फसवणुक टाळाण्याच्या दृष्टीने जनजागृतीपर सुचना प्रदर्शित केल्या आहेत. नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या अथवा विविध कामासाठी येणाऱ्या जनतेचे लक्ष वेधण्यासाठी ह्या सुचना प्रदर्शित केल्या आहेत. या सुचनांद्वारे जनतेनी व्यवहार करतांना काय दक्षता घ्यावी याबाबत विस्तृत माहिती देण्यांत आली आहे. जनतेनी या सुचनांचे पालन करून अश्या फसवणुकीला पायबंद केल्यास त्यांची होणारी फसवणुक नक्कीच टाळता येऊ शकते.