फुल गुलालाची उधळण करीत गणरायाला उत्साहात निरोप!

52
फुल गुलालाची उधळण करीत गणरायाला उत्साहात निरोप!

फुल गुलालाची उधळण करीत गणरायाला उत्साहात निरोप!

फुल गुलालाची उधळण करीत गणरायाला उत्साहात निरोप!

✍🏻गोपाल नाईक✍🏻
नांदेड जिल्हा प्रतिनिधी..
मो.7499854591.

नांदेड : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात माहूर येथील १४ सार्वजनिक गणेश मंडळासह इतर गणेश मुर्तींचे विसर्जन उत्साह व शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परंपरे नुसार माहूर शहरातील गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ता. २९ शुक्रवार रोजी विसर्जन झाले. सुखकर्ता,दु:खहर्ता,गणरायाची १२ दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर शुक्रवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत – गाजत उत्साही वातावरणात निरोप दिला.ठराविक मिरवणूक मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.ढोल, ताशे, लाऊडस्पिकरसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता.नगर पंचायत कडून या वेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याचा नगर पंचायत कडून सत्कार करण्यात आला.या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, शिवसेना विधानसभा प्रमुख ज्योतिबादादा खराटे, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, उपनगराध्यक्ष नाना लाड,मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड,नगरसेवक विजय कामटकर, अशोक खडसे,राजू सौंदलकर, रणधीर पाटील, गोपूभय्या महामुने, विक्रम राठोड, यांच्या सह नगर सेवक, नगर सेविका, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी व नगर पंचायत चे कर्मचारी उपस्थितीत होते.नगर पंचायत कडून मिरवणूक दरम्यान महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी सदानंद शिंनगारे माहूर चे पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन काशीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..