डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, येथे झाडे लावा झाडे जगवा उपक्रमाचे आयोजन
समता शिक्षण संस्था पुणे संचलित हा उपक्रम राबविण्यात आला
प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो. 📱 9511655877
नंदुरबार : झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम दि. 01 ऑक्टोबर रोजी शिक्षण संस्था पुणे संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी शैक्षणिक वर्ष 2023 -24 चे BSW, MSW चे प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांच्या हस्ते हे झाडे लावण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा काही झाडे लावले होते.तसेच झाडे लावून झाल्यावर वेगवेगळ्या घोषणाबाजी करण्यात आली होती.
जोडो जोडो,भारत जोडो, जात पात के बंधन तोडो, भारत जोडो भारत जोडो,
झाडे लावा, झाडे जगवा, हम सब, एक है अशा प्रकारे विदयार्थ्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे उपक्रमाची शोभा वाढली होती.
यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. गोपाल निंबाळकर प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे आणि BSW. MSW चे विद्यार्थी उपस्थित होते