५ ऑक्टोरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही : रोहा कृषी विभागाकडून विशेष मोहीम

५ ऑक्टोरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही : रोहा कृषी विभागाकडून विशेष मोहीम

५ ऑक्टोरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही : रोहा कृषी
विभागाकडून विशेष मोहीम

५ ऑक्टोरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही : रोहा कृषी विभागाकडून विशेष मोहीम

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर सध्या शेतकरी १५ वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. परंतु पात्र लाभाथ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सुचनेनुसार लाभार्थ्यांनी गुरुवार दि.५ ऑक्टबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार असल्याचे रोहा तालुका कृषी अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे .तर यासाठी तालुका स्तरावर विशेष मोहीम विभागाकडून राबवली जात आहे.
रोहा तालुक्यातील ९०३७ शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर ५८३ लाभार्थीची ई -केवायसी तर १३११ लाभार्थीची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. मागील अनेक महिन्यापासून ते आजपर्यंत या संदर्भात गावस्तरावर लाभार्थी यांना तसेच शेतकऱ्यांना विभागीय कृषि अधिकारी वर्गांकडून वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे तर अधिक शेवटी ची गुरुवारी दि.५ ऑक्टोबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा या लाभार्थ्यांची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी हे स्वतः जबाबदार राहतील अशी माहिती तालुका कृषिधिकरी महादेव करे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे तसेच ती लवरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे .