वर्धा जिल्ह्यातून कलाल-कलार समाजाची पारंपारिक मद्य व्यवसायासाठी हुंकार!
दिनांक १ आक्टोंबर २०२३ रोज रविवारला वर्धा येथील शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे संघटनेच्या वतीने समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक वर्धा जिल्ह्यात ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे याच भुमितुन १९३४ ला महात्मा गांधींच्या आदेशाचे पालन करुन आपल्या पारंपारिक व्यवसायाचा कलार समाजालने त्याग केला व संपूर्ण कलार-कलाल समाज स्वतंत्र लढ्यात तुटुन पडला.परंतु स्वातंत्र्यानंतर सरकारने कलाल-कलार समाजावर अन्याय केला.यामुळे याच पावनभुमितुन कलार समाजाला अवश्य न्याय मिळेल याच उद्देशाने बापुंना वंदन करून वर्धा जिल्ह्यात बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
या बैठकीमध्ये समाचे अनेक ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.पहिला मुद्या म्हणजे सरकारने मराठा समाजाला आरक्षणाकरीता निजामकालीन वंशावळी मागविली आहे.निजामाचा काळ जावुन ३५० वर्षें झालीत.परंतु कलार-कलाल समाजाचा पारंपारिक (मद्य) व्यवसाय गेल्या ७६ वर्षांपासून सरकारने समाजापासुन हिरावला त्याचे काय? त्यामुळे तो आम्हाला परत करण्यात यावा,दुसरा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लॉन्च केली यात पारंपारिक व्यवसायाचा समावेश आहे म्हणजेच बारा बलुतेदार यात पारंपारिक व्यवसाय करणारे सर्वच आलेत यातुन कलार-कलाल समाजाला का वगळण्यात आले? त्यामुळे विश्वकर्मा योजनेचा संपूर्ण लाभ कलार समाजाला मिळावा.
तिसरा मुद्दा म्हणजे राज्यात दारू विक्रीच्या दुकानांचे नवीन परवाने देणे १९७३ पासून बंद असतांना आता दारू उत्पादक कंपन्यांना नवीन विक्री परवाने देण्याचे उत्पादन शुल्क विभागाने प्रस्तावित केले आहे.उत्पादन शुल्क वाढीसाठी हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री अजित पवार यांच्याकडे दिला आहे.म्हणजेच राज्यात दारू दुकानांची संख्या वाढविण्याचा सरकारचा विचार आहे.त्यामुळे सरकार दारूचे दुकाने वाढवित असेल तर यात पहिले प्राधान्य कलार समाजाला मिळावे अशाप्रकारे बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.त्याचबरोबर इतर समाजाप्रमाणे कलार समाजाच्या विकासासाठी, विद्यार्थींच्या व बेरोजगारांच्या उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे यावर सुध्दा सविस्तर चर्चा करण्यात आली.
सरकार जर समाजाच्या पारंपारिक व्यवसाय व महामंडळ यावर गांभीर्याने विचार करीत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत कलार समाज आपली एकता व ताकद आवश्यक सरकारला दाखवेल.त्याचप्रमाणे सरकार संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी लागू करीत असेल तर संपूर्ण कलार-कलाल समाज त्याचे स्वागतच करेल.अन्यथा आमचा हक्काचा व्यवसाय आम्हाला सरकारने स्वखुशीने परत करावा. अशाप्रकारचे उदगार समाजबांधवांनी या बैठकीत काढले.यावेळी प्रामुख्याने समाजाचे जेष्ठ नेते चंद्रपालजी चौकसे, माजी राज्यमंत्री व माजी आमदार डॉ अविनाश वारजुकर,समाजाचे जेष्ठ स्वतंत्र पत्रकार/लेखक रमेश लांजेवार,महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पप्पु भाऊ जैस्वाल,विदर्भ अध्यक्ष सुरेश मेश्राम,विदर्भ अध्यक्ष महिला आघाडी रेखा प्रिंपाळे,अमरावती अध्यक्ष नंदलाल कावरे,मनोज मेश्राम,दिपक ऊके,बाळासाहेब लाळे, मोहन मोहिते,आदमाने,सुरेश जरोदे,तिर्थराज बिजेवार कार्यक्रम आयोजक ओम डगवार, नयन ताडपिल्लेवार,सुनील ऊके,कमलेश डगवार सह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.९९२१६९०७७९