महात्मा गांधी जयंती स्वछता सप्ताह निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

महात्मा गांधी जयंती स्वछता सप्ताह निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

महात्मा गांधी जयंती स्वछता सप्ताह निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

महात्मा गांधी जयंती स्वछता सप्ताह निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रकाश नाईक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
मो. 📱 9511655877

नंदुरबार : धुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि म.गांधीजी तत्वज्ञान केंद्र,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महात्मा गांधीजींचे विचार शिबिर व श्रमदान शिबीर महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठचे संचालक मा.प्रा. डॉ. सचिन नांन्द्रे , धुळे पश्चिम विभाग रासेयो समन्वयक प्रा. डॉ. हेमंत जोशी आणि प्रा. डॉ.सुनील पाटील, तसेच म गांधी तत्वज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ.पी. के. पाटील हे उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. नांन्द्रे यांनी गांधीजीच्या जीवनावर विविध उदाहरणे देऊन माहिती दिली असून तसेच राष्ट्रीय सेवा योजना याचे उद्देश, विविध उपक्रम, शिबिरे, त्यासाठी च्या तयारी, पात्रता, युवकामधील प्रामाणिकपणा, शिस्त, उत्साह याची जोड असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात प्रा.डॉ.पी.के. पाटील यांनी म गांधीजीचे जीवनचरित्र सांगून म गांधी तत्वज्ञान केंद्र विषयी माहिती दिली. या कार्यक्रमात धुळे शहरातील विविध राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी साधारण पणे 150 विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.डॉ. बाजीराव पाटील यांनी आभार व्यक्त केले व स्वच्छता विषयक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली होती.