रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन,म्हसळा, तळा,माणगाव, रोहा येथील विविध विकास कामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे, ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावे असे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालय दालन येथे श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्वला दांडेकर, उपवनसंरक्षक रोहा आप्पासाहेब निकत, मुख्याधिकारी म्हसळा विठ्ठल राठोड, श्रीवर्धनचे विराज लबडे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका , रायगड पाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, तळा महादेव चा तलाव परिसराची पर्यटन दृष्ट्या सुधारणा करणे, मोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणे, रोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणे, रोहा येथील ग्रामपंचायत पाटण सई हद्दीतील कामे, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरण, मौजे नागठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण, रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण, तळघर येथील तलावाचे संवर्धन करणे अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१_२२ मधील श्रीवर्धन,म्हसळा, तळा,माणगाव, रोहा येथील विविध ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासीइमारतींचे नूतनीकरण, तलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामे, श्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामे, रोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरण, रोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणे, तळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.