मंदिराच्या छतावर वाघ अन् खाली भाविक…. • चिमूर येथून भाविकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

मंदिराच्या छतावर वाघ अन् खाली भाविक.... • चिमूर येथून भाविकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

मंदिराच्या छतावर वाघ अन् खाली भाविक….

• चिमूर येथून भाविकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

मंदिराच्या छतावर वाघ अन् खाली भाविक.... • चिमूर येथून भाविकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 5 ऑक्टोंबर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या ताडोबा बफर भागात निमढेला गावातील एक थरारक चित्रफित प्रसारीत होत आहे. निमढेला गावातील विठ्ठल- रूखमाई मंदिराच्या शेजारी वाघाचा बछडा दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. वर वाघ आणि छताखाली मंदिरातील भाविक अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मंदिरात आलेल्या भाविकांना अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता आले. मात्र इतक्या जवळून वाघ पाहिल्याने भाविकांची काही काळ घाबरगुंडी उडाली होती. काही वेळानंतर हा वाघ जंगलात दिसेनासा झाला. तोवर भाविकांनी श्वास रोखून धरला होता. एका वन्यजीवप्रेमीने ही चित्रफित त्याच्या कॅमेरात कैद केली असून सध्या ती चित्रफित सामजिक माध्यमांवर प्रसारीत होत आहे.

चंद्रपूर जिल्हा संपन्न वन्यजीव आणि वन वैविध्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात एक ऑक्टोबर पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गाभा पर्यटन खुले झाले आहे. मात्र बफर भागातही वाघांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याच बफर भागात चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे असलेल्या विठ्ठल- रुक्माई मंदिराच्या टीनाच्या छताच्या शेजारी वाघ आणि खाली भाविकांची पूजा अर्चना असा प्रकार बघायला मिळाला.

या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र इथे कधीही वाघ- मानव संघर्ष बघायला मिळालेला नाही. पण छोटा मटका नावाचा वाघाचा बछडा या ठिकाणी सतत वास्तव्याला असतो. मंदिरात भाविक असताना छोटा मटका वाघ पत्राच्या शेजारी उभा होता. दुसरीकडे खाली मंदिरात भाविक आरती करत होते. मंदिराच्या वर वाघ पाहून भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्याचवेळी बंडा अरविंद नावाच्या वन्यजीवप्रेमीने हे दृश्य कॅमेरात कैद करत सामाजिक माध्यमांवर टाकले. आता ही चित्रफित प्रचंड व्हायरल होत आहे.