सायन कोळीवाडातील श्रावस्ती बुध्द विहारात "वर्षावास प्रवचन मालिका"

सायन कोळीवाडातील श्रावस्ती बुध्द विहारात “वर्षावास प्रवचन मालिका”

सायन कोळीवाडातील श्रावस्ती बुध्द विहारात "वर्षावास प्रवचन मालिका"

गुणवंत कांबळे
✍️मुंबई प्रतिनिधी✍️
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई- बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र ५२२ संलग्न माता रमाई महिला मंडळ आणि श्रावस्ती बौध्दजन सेवा संघ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आदरणीय बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सायन कोळीवाडा स्थित “श्रावस्ती बुध्द विहार” येथे गुरुवार दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी
“वर्षावास प्रवचन मालिका”
‘साप्ताहिक बुध्द वंदना’ दरम्यान
स्नेहा संस्था यांचे संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.

ह्यावेळी स्नेहा संस्था चे क्षेत्र प्रमुख अधिकारी पुजा मॅडम, क्षेत्र प्रतिनिधी प्रशांत गावकर, वंदना शिंदे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून स्नेहा संस्थेने आतापर्यंत लोकोपयोगी कार्य आणि राबवित असलेल्या उपक्रमाची विस्तृतरित्या माहिती दिली.

रोजच्या जीवनातील विविध समस्या
उदाहरण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, पोलिस गुन्हा, मानसिक स्वास्थ्य आदी विषयावर उपस्थित नागरिकांबरोबर परिसंवाद साधून मानवी नैतिक हक्क मिळविण्यासाठी नागरिक म्हणून आलेल्या किंवा येणा-या समस्यांसाठी प्रामुख्याने वाढत्या गुन्हांना आळा घालण्यासाठी आणि एक आदर्श पारिवारिक समाधानी जीवन जगण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील स्त्री पुरुष एकत्रित संगठन निर्माण करून स्वतः च कसे प्रशिक्षित होऊन आत्मविश्वासाने लढा द्यावा ? ह्यासंदर्भात स्नेहा संस्था मार्फत विविध उपक्रमातून कसे सहकार्य आणि मार्गदर्शन घेता येईल ? याचे क्षेत्र प्रमुख अधिकारी पुजा मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

ह्याप्रसंगी शाखेचे अध्यक्ष प्रदिप हरचिरकर, चिटणीस निलेश ईस्वलकर, प्रमुख सल्लागार शरद हातखांबकर, माता रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा आरती ईस्वलकर, सचिव जान्हवी माजळकर, उप सचिव स्वप्नाली सकपाळ यांच्यासह प्रगती चाळ कमिटी, नवविकास चाळ कमिटी, आदर्श चाळ कमिटी यांचे पदाधिकारी तसेच, प्रामुख्याने बहुसंख्येने महिलांच्या उपस्थितीसह शालेय विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.

शेवटी आभार प्रदर्शन करताना बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी स्नेहा संस्था च्या कौटुंबिक उपक्रमात सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा संघटनेचे जेष्ठ नागरिकांच्या हस्ते स्नेहा संस्थेला भेट देऊन जाहिररित्या आभार मानून सांगता केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here