परिचारिकेचा आकस्मिक मृत्यू

परिचारिकेचा आकस्मिक मृत्यू

परिचारिकेचा आकस्मिक मृत्यू

परिचारिकेचा आकस्मिक मृत्यू

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

सावली : 6 ऑक्टोंबर
येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेचा शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलका अशोक नागरे (26) असे मृतक परिचारिकेचे नाव आहे. सावली ग्रामीण रुग्णालयात ही परिचारिका मागील चार वर्षापासून कर्तव्यावर होती. ती मूळची जालना जिल्ह्यातील होती. नोकरी निमित्ताने ती सावली येथे राहत होती. ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असताना तिला अचानक चक्कर आली. उपचाराकरिता तिला गडचिरोली येथे भरती करण्यात आले. परंतु मेंदूमध्ये गाठ असल्याचे निष्पन्न झाल्याने रक्तप्रवाह बंद झाला होता. त्यामुळे पुढील उपचाराकरिता नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारदरम्यान परिचारिकेचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला.