आपल्या न्याय हक्काचा मागण्यासाठी पुढे या पंचायत समिती स्तरावर धरणे थाळीनाद आंदोलन

आपल्या न्याय हक्काचा मागण्यासाठी पुढे या पंचायत समिती स्तरावर धरणे थाळीनाद आंदोलन

आपल्या न्याय हक्काचा मागण्यासाठी पुढे या
पंचायत समिती स्तरावर धरणे थाळीनाद आंदोलन

आपल्या न्याय हक्काचा मागण्यासाठी पुढे या पंचायत समिती स्तरावर धरणे थाळीनाद आंदोलन

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

उमरेड. जिल्हा परिषद येथील सेवानिवृत्त शिक्षकांचा वेळीच सेवानिवृती नंतरचे लाभ व निवृत्तीवेतन दरमहा अनुदान आभावी वेळीत मिळत नसल्यामुळे सरकार चष्मा निषेध करण्यासाठी लक्ष वेधावे म्हणून हिवाळी अधिवेशनात 22डिसेंबर 2022ला सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता सन्माननीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मागण्यांचा निवेदन देण्यात आले होते. त्यावर आजपर्यंत निर्णय घेण्यात आला नाही व चर्चेला सुद्धा आमंत्रित करण्यात आले नाही त्या मुळे सेवानिवृत्त शिक्षकांत मोठा असंतोष घुमसत आहे. मांगण्यात लक्ष वेधावे म्हणून पंचायत समिती उमरेड च्या आवारात उपरोक्त शिक्षक महासभाने घेतला आहे. या आंदोलनात प्रलंबीत मागण्यावर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे.
पंचायत समिती स्तरावरील धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा महासभेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांना करण्यात येत आहे
धरणे आंदोलनातील मांगण्याची सनद
1)जिल्हा परिसदेतून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतरचे लाभ वेळीच देण्यात यावे
2)सेवानिवृत्त शिक्षकांना प्रशासकीय चुकामुळे 1ते 2 वर्षाचा कालावधी होऊनही सेवा उपादान. अधिक कालावधी झालेल्या रकमावर शासकीय आदेशाप्रमाणे व्याज देण्यात यावे
3)गटविमा योजनेची रक्कम परिगनेसह सेवानिवृत्तीच्या वेळीच देण्यात यावी जि. प नागपूर येथे सन 2019 पासून देण्यात आली नाही ती देण्यात यावी
4) महाराष्ट्र शासनाने 1जाने.2016पासून सातवा वेतन आयोग लागू केला 3वर्षाची थकबाकी 5हप्त्यात देण्यात निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला त्याप्रमाणे याचा लाभ म्हणून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकीचे चार हप्ते देण्यात आले परंतु नागपूर जि. प. त कार्यकरत असणाऱ्या शिक्षकांना एकही हप्ता देण्यात आलेला नाही 31 डिसेंबर 2018 पूर्वी सेवानिवृत्त शिक्षकांना एक हप्ता प्राप्त झाल आहे. देय झालेले 3हप्ते झाले नाहीत. त्वरित देण्यात यावे.
6)दिनांक 30जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना लगतच्या 1जुलै रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करून इतर लाभ शासनादेशाप्रमाणे त्वरित देण्यात यावे
7)सेवानिवृत्त झालेल्या शिखकांना दरमहा 1तारखेला निवृत्तीवेतन देण्यात यावे
8)शालेय शिक्षक विभागातर्गत असणाऱ्या शिक्षकांना निवृत्ती वेतन कोषागारातून देण्यात येते. ह्याच धर्तीवर जि. प. तील शिक्षकांना कोषागारातून निवृत्तीवेतन देण्याबाबतचे धोरण राबवण्यात यावे.
9)शिक्षकांना देय असणारी निवडश्रेणी सन 1968पासून प्रलंबित आहे.व काहींना आदेश होऊनही त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. तो त्यांना त्वरित देण्यात यावा
10) तक्रार निवारण समितीच्या सभा दर तीन महिन्यांनी नियमित जिल्हा व प. सं. स्तरावर घेण्यात याव्यात
11)अंशदान रसिकरण कपात कालावधी 15वर्षे ऐवजी 12वर्षे करण्यात यावा.
12)जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या खाती सेवा निवृत्त हातांना शिल्लक असलेल्ल्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे
13) दि 1जुलै 1995 पासून पदोनत झालेला केंद्र प्रमुखांना कर्तव्य व जबाबदारी ची वाढ झाल्या मुळे पूर्वलश्री प्रभावाने येत वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी
14) सेवानिवृती उपदान मंजूर करताना केंद्र सरकारच्या धर्तीवर मूळ पगार अधिक महागाई भत्ता याची गणना करून देण्यात यावी.
15) 24 वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्या नंतर बिना अट 100% लाभार्थीना निवड श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात यावा.
16) सेवेत असताना 12वर्षानी व 24वर्षानी अनुक्रमे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करीत असता ना वेतन श्रेणित बदल होत असल्यामुळे प्रत्येक वेळी 1वेतनवाढ देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी .
उपस्थिती सचिव प्रभाकर लांजेवार उपाध्यक्ष केशवराव दांडदे श्रीराम वाघे हरिश्चन्द्र पुंड देवराव बेले राजहंस देशमुख वसंत लांडे विलास येरखेडे लक्षण बेले संजय शंभरकर शेषकुमार मेश्राम किसना गवळी फत्तु देशमुख योगेश्वर कांबळी दादा मोठघरे सुशीला बबस्कर कमाल देशमुख उषा खांबाढकर आदि शिक्षक उपस्थिती राहील आंदोलन दि 9 ऑक्टोंबर 2023 सकाळी 11ते 5 वाजे पर्यंत