श्रीमंत अंजनवेल ग्रामपंचायत आज कंगाल,का ? काका कदम.
✍️सचिन पवार/विवेक काटोलकर ✍️
कोकण विभाग प्रतिनिधी
📞8080092301📞
रत्नागिरी :- एकेकाळी सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत महणून ओळखली जाणारी अंजनवेल ग्रामपंचायत नक्की आज कंगाल का झाली आहे ?? याचा संपूर्ण फार्दाफार्स करण्या करिता कोकणचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई गोवा महामार्गावरील कामाचे शासन,प्रशासन, आणि अधिकारी वर्ग या मधील समन्वयक आणि अंजनवेल चे मूळ रहिवाशी श्री काका कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंचश्री.यशवंत बाईत आणि उपसरपंच श्री.आत्माराम मोरे यांच्या मनमानी कारभाराचा पाडाच वाचून दाखविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून काका कदम यांनी भ्रष्ट कारभारातील महत्वाचे विषयांचे पोस्ट मार्टेम केले. गांधी जयंती दिनी देशभर स्वच्छता मोहीम सुरू होत्या ग्रामपंचायती मार्फत ती अंजनवेल मध्येही पारपडली पण त्या स्वच्छ मोहिमेत या भ्रष्ट कारभारातून ग्रामपंचायत बाहेर काढायची आणि तीही लोकशाहीतील ४ थे स्तंभ आणि तिसरे नेत्र समजल्या जाणाऱ्या पत्रकार बंधू समोरच ही मोहीम घेतली आहे असे काका कदम यांनी सांगतानाच प्रत्येक पत्रकाला माहितीच्या अधिकारात प्राप्त सर्व कागदपत्र पुरावे म्हणून सुपूर्द केले.स्वतः माजी सरपंच १० वर्षे सरपंच होते त्यांनी केलेल्या चुका आणि त्यामुळे ग्रामपंचायतीला आलेली आर्थिक कांगाली उघड केली. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी त्यांनी खुद्द ग्रामपंचायतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली याचे तीव्र पदसाड सर्व धर्मीय असलेल्या अंजनवेल मध्ये उमटले.सर्वानुमते ठराव झाला आणि आता चुकीला क्षमा नाही. दोषी ना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे या निर्धाराने सर्व अंजनवेलकर पेटून उठलेले पाहायला मिळाले.सोमवार दि.०२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता अंजनवेल ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात कोकणातली पत्रकार यांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व पत्रकारांनी उदंड प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने रायगड,रत्नागिरी, शृंगारतली,गुहागर सह ईतर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंजनवेल ग्रामपंचायत हि रत्नागिरी जिल्हा मधील गृहागार तालुका मधील एक सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली ग्राम पंचायत होय. या गावात एन्रॉन कंपनी आली आणि ग्रामपंचायतीला आर्थिक झळाळी आली. दर वर्षी १ कोटी अधिक इतर शासकीय निधी असे एकूण १ कोटी ४० लाख निधी उपलब्ध होऊ लागला.त्यामुळे इथे मनमानी कारभाराला सुरुवात झाली. कोणतेही आर्थिक निकष न पाळता बेसुमार खर्च होऊ लागला. फक्त ग्रामसभेत ठराव मंजूर झाला म्हणजे सर्व काही झाले असे समजून एका विशिष्ठ समजला ग्राम सभेला बोलावून त्या मेजोरिटी च्या जोरावर ठराव संमत करून घेण्याचा सपाट
श्री.यशवंत बाईत आणि उपसरपंच श्री आत्माराम मोरे यांनी लावला. माहितीच्या अधिकारातून प्राप्त माहिती तपासली असता,ग्राम सभेस आलेले सर्व विषय हे मनमानीचे असल्याचे उघड होतात. जर या ठरवा विरुद्ध कोण बोलण्यास उभे राहिले की मेजोरीटी ची कोल्हेकुयी करून त्यांना बोलू द्यायचे नाही असा कार्यक्रम आखला जाऊ लागला. आणि गोंगाटात ठराव पास होऊ लागले. त्याचा दुष्परिणाम असा झाला की ग्राम पंचायत आर्थिक कांगालीत गेली. त्यातच सन २०२०-२०२५ साला करीता आरक्षण जाहीर झाले त्यात अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच पद इतर मागास वर्गीय महीलांसाठी राखीव झाला. त्याची कुणकुण सन २०१९-२० ला माजी सरपंच आणि उपसरपंच याना लागली आणि खरी लूट सुरू झाली. तत्कालीन महारष्ट्र सरकार मधील उपमुख्य मंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण धोरण आणायचे ठरविले त्याला अनुसरून इच्छुक ग्रामपंचायत कडून अर्ज मागविण्यात आले. त्यात आमच्या अंजनवेल ग्रामपंचायत ने अर्ज केला. तत्पूर्वी तेजस मानांकान मिळावे म्हणून मुख्य शाळा संकुलाच्या नावे अर्ज न करता अंजनवेल शाळा क्रमांक २ कातलवाडी या नावे अर्ज करण्यात आला. त्यामुळे त्या शाळे च्या वास्तुस तेजस नामांकन प्राप्त झाले. त्या वस्तू.मध्येच आंतरशालेय शिक्षण सुरू करण्याची मान्यता ,तत्वतः प्रायोगिक तत्त्वावर ३ वर्षासाठी मिळाली.या शाळेची वास्तू सुसज्ज असून सर्व सोयींनी युक्त आहे असे स्वतः माजी सरपंच यशवंत बाइत लेखी शासनात कळवितात असे माहितीच्या अधिकारातील कागदपत्र पाहताना स्पष्ट होते तरीही नवीन वर्ग खोल्या आणि इतर सुविधा देण्यासाठी नवीन इमारत बांधण्याचा घाट रचून जवळ पास २ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचे उघड होते. या शाळा संकुलाला विरोध नको म्हणून या शाळेचे नाव अटल बिहारी वाजपेयी देण्यात आले.
अंजावेल,रानवी,वेलदुर, या तीन ग्रामपंचायती ह्या भजपा चे बाले किल्ले म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यातच युती असल्यामुळे हा मतदार संघ बहुसंख्य शिवसेनामय असून सुद्धा भाजपा कडे होता. डॉक्टर श्रीधर नातू त्या नंतर विनय नातू असाहा मतदार संघ वंशपरंपरेने भाजपा कडे होता. परंतु यशवंत बाइत यांनी इतकी हुकूमशाही केली की दुसऱ्या कोणत्याही कोणत्याही लोकप्रतिनिधींचा निधी गावात येवू दिला नाही. त्यामुळे झाले असे की कंपनीचा निधी आणि स्थानिक निधी वारेमाप खर्च करू लागले. विचार करणारे कोणीच नाहीत असे गृहीत धरून वारे माप लूट सुरू असतानाच मुंबई लालबाग मधील शिवसैनिक आणि अभ्यासू व्यक्तीमत्व श्री.काका कदम यांनी यशवंत बाईत यांच्या विरुद्ध दंड थोपटले. त्यावेळी स्वतःला शिवसेनेचे स्वंयघोषित नेते समजणारे आत्माराम मोरे यांनी काका कदम यांना विरोध करून स्वार्थासाठी यशवंत बाईत याना मदत केली. मात्र काका कदम यांनी सन २०१६ पासून हळू हळू गावात जागृती करून सर्व पुरावे गोळा केले. या कामी त्यांना श्री विजय कदम मिरा भायनदर चे शाखाप्रमुख यांनी मार्गदर्शन केले. विजय कदम यांच्या अकाली मृत्यू नंतर थोडे दिवस एकाकी पडलेल्या काका कदम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठी जनजागृती करूनं जनसमुदायाला जागरूक केले. सर्व प्रथम वैश्य समाज विश्वस्त असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्याचा संकल्प करून सर्व धर्मीय समाज एकत्र केला. त्यांच्याशी जनसंपर्क सततचा वाढवून त्याची यशस्वी सांगता सन २०२०-२५ च्या निवडणुकीत सुस्पष्ट बहुमत मिळवून यशवंत बाईत यांच्या पॅनल चा धुव्वा उडविला. जनतेतून सरपंच निवड करायची जबाबदारी ग्रामस्थांच्या मदतीने पारपाडून आज सौ. सोनल मोरे या उच्च शिक्षित महिला यांना सरपंच पदी निवडून आणले. आणि खरी पोलखोल सुरू केली. मात्र आपले आता काही.खरे नाही असे दिसले म्हणून यशवंत बाईत आणि माजी सरपंच आत्माराम मोरे यांनी ग्रामपंचायती विरोधात तक्रारी करून गुंतवून ठेवण्याचे षढयंत्र रचल्याचे काका कदम यांच्या लक्ष्यात येताच काका कदम यांनी मुंबई वरून मोबाईल फोन वरून निवडून आलेल्या सर्व सदस्यांची शरद यादव,यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आणि मार्गदर्शन केले आणि गणेशोत्सव करीता गावी आले आणि पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यात सर्व पोलखोल करण्यात आले. श्री यशवंत बाईत आणि आत्माराम मोरे यांच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी तपासल्या. श्री कदम हे मुंबई महापालिकेतून ऑडिटर पदावरून निवृत्त झाले असल्याने त्यांना लेखा परिक्षणाचे चांगला अनुभव असल्याने त्यांनी मागील कारभाराचे लेखापरीक्षक यांचे शेरे मागविले याचे उत्तर तोंडी देता येत नाहीत असे सांगितले. ते लेखी पत्र देवून मागितले तर त्याचेही नाकरार्थि उत्तर आले आणि संशयाला अधिकच बळकटी आली. म्हणून माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करून सर्व कागदपत्र प्रप्त करून हा आजचा पोलखोल करण्यात येत आहे. सतत ग्राम विकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यानच्या विरोधात तक्रार करून त्यांना त्रास देण्याचे कारस्थान सुरू झाले जेणे करून कोणताही अधिकारी अंजनवेल ग्रामपंचायत ला सहकार्य करू नये. म्हणून आता या सर्व तक्रारींचे एकत्रीकरण करून वरिष्ठ पातळीवर चौकशी लावावी यासाठी जिल्हापरिषद, कोकण आयुक्त, लोकायुक्त, ग्रामविकास मंत्री, पोलिस अधीक्षक रत्नागिरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुहागर पोलिस ठाणे याना तक्रारी देण्यात येवून सखोल चौकशी करून दोषीवर कायद्याने ग्राह्य असलेली काठोरातील कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंतर राष्ट्रीय शाळेच्या नावाने ग्रामपंचायतीने स्क्रुल बस कोंत्रेक्टर न मागवता स्वतः बस विकत घेतल्या आणि त्या सुरू राहण्यासाठी स्वरा ठेकेदाराला भाडे देण्याचे कबूल केले त्यामुळे बस खरेदी मुळे ५० लाख जास्त रक्कम खर्च झाली तसेच महिन्याचे भाडे असे मिळून खर्च वाढत गेला. तसेच गावात शैक्षणिक संकुल उपलब्ध असताना २ कोटी ची उधळपट्टी करण्यात आली आहे. या खर्चा साठी बँक ऑफ इंडिया मध्ये अपंग पेन्शन योजना, इतर आकस्मिक खर्च करता यावा यासाठी असलेला निधी हा राखीव निधी संबोधून त्या मुदत ठेवी तोडण्यात आल्या आणि खर्च करण्यात आल्या.मात्र आता ग्रामपंचायतीस मिळणारा कर एन्रॉन आताची RGPPL कंपनीने देण्यास नकार दिला कारण आता NTPC ही मुख्य कंपनी झाल्यामुळे ती केंद्र सरकारचा उपक्रम असल्यामुळे तिला ग्रामपंचायतीला कर देणे बंधनकारक नाही असे कारण पुढे करून त्यांनी कर देणे बंद केल्यामुळे ग्रामपंचायतीला आर्थिक स्त्रोत बंद झाले असल्यामुळे लाईट बील भरणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात श्रीमंत असलेली ग्रामपंचायत आता चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कंगाल झाल्याचे उघड झाले आहे.काका कदम सर्व ग्रामस्थांना घेवून पालक मंत्री आणि उद्योग मंत्री यांच्या दालनात घुसून उपोशन करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून गनिमी काव्याने जोरदार तयारी सुरू आहे.
या प्रश्ना बाबत माजी आमदार श्री. विनय नातू यांचे काका कदम यांच्याशी बोलणे झाले असून सरकार दरबारी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. तर पत्रकार परिषदेतही काका कदम यांनी विद्यमान आमदार श्री भास्कर जाधव ढाण्या वाघ असा उल्लेख करून ते असतानाही या माजी सरपंच यांच्या असहकारमुळे काम करू शकले नाहीत तर युती च्या राजवटीत माजी आमदार जरी भाजपा चे होते तरी त्यांना कसं करण्याची मुभा माजी सरपंच यशवंत बाईत यांनी दिली नाही त्यामुळे भाजपा चे मोठे नुकसान हित असल्याचे भाजप चे स्थानिक पदाधिकारी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर करीत आहेत. आता भास्कर जाधव हे कामात वाघ असल्यामुळे तिरंगी काढत झाली तरच हा मतदार संघ पुन्हा भाजपा ला मिळू शकतो. अन्यथा नाही असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. या सर्व प्रकारात खासदार सुनील तटकरे यांनीही अजंनवेल कडे केलेले दुर्लक्ष्य चर्चेचा विषय ठरू नये म्हणून तेही खासदार निधी देणार असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादी च्या गोटात आहे. एकंदरीत अंजनवेल वर निधीचा वर्षाव होणार असे चित्र आहे. या बाबत काका कदम यांच्याशी संपर्क केला असतां ते म्हणाले की आम्ही निधी पासून खरोखर वंचित आहोत. आम्हाला जे भर भरून निधी देतील. आमचा कमपनिकडून बंद झालेला कर मिळवून देतील त्यांना अंजनवेल कर आपले मानायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण आज कर्मचारी यांचा पगार द्यायला आणि लाईट बील भरायला पैसे नाहीत अशी अशी दुर्दैवी अवस्था आमची आहे. मी स्वतः आमचे आमदार याना साकडे घातलेले आहेच, विक्रांत जाधव यांनाही आणि विनय नातू आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण यांच्याशी युतीतील जुने संबंध लकशात घेवून निधीसाठी विनंती केली आहे. आमच्या अंजनवेल मध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे. सडे वाडी भोई वाडी येथे खूपच हाल होत आहेत. त्या समस्यांकडे तातडीने लक्ष्य द्यावे अशी विनंती सर्व लोकप्रतिनिधींना केली असल्याचे काका कदम यांनी आणि सरपंच सोनल मोरे आणि उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे यांनी सांगितले. तर शिवसेना विभागप्रमुख तंटा मुक्ती अध्यक्ष श्री.शरद यादव यांनी सादर बाबतीत आमदार भास्कर जाधव लखदेवून असून ते स्वतः संपर्क ठेवून असल्याचे बोलले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला काका कदम यांनी पुष्पमाला अर्पण केली. तर महात्मा गांदी यांच्या तसबिरीस सरपंच सोनल मोरे,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे यांनी पुष्पमाला अर्पण केली आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नंदकुमार खेतले यांनी पुष्प माला आरपण केली श्री शरद यादव आणि काका कदम यांनी ग्रामदैवता श्री उत्राज काळेश्वरी ला स्मरून श्रीफळ ठेवून पुष्पमाला वाहिली. या नंतर काका कदम यांनी पत्रकार परिषदेतचे आयोजन स्पष्ट करीत पुरव्यासहित स्पष्टी कारण करून प्रत्येक पत्रकाराला पुराव्यांच्या प्रति दिल्या.सध्या अंजनवेल ग्रामपंचायतची सत्ता ही ग्रामविकास पॅनल कडे आहे आणि त्यांच्याकडे १२ पेक्की एकूण नऊ जागे चे स्पष्ठ बहुमत आहे. ते सर्व उद्धब बाळा साहेब ठाकरे गटा चे समर्थक आहेत. पत्रकार परिषदे वेळी व्यपीठावर काका कदम सह विद्यमान सरपंच सौ. सोनल आर. मोरे,उपसरंच श्री.बाळकृष्ण सुर्वे, नदू खेतले, योगेश धामणस्कर, समद आचरेकर, वहिदा खतीब, फौजिया पठाण, सानिका नरवनकर,सुवर्णा सैतवडेकर, ग्रामस्थ शरद यादव(तंटा मुक्ती समिती अध्यक्ष, नदिम काकडे,मुरलीधर शिरगावकर आदी उपस्थित होते.