नवरगाव येथे शौर्य जागरण यात्रा संपन्न
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
नवरगाव : 9 ऑक्टोंबर
शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती निमित्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आलेल्या “श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे” 8 ऑक्टोंबर, रविवारला ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यात्रेची भव्य मिरवणूक सिंदेवाही, पळसगाव, देलनवाडी, धूमनखेडा मार्गे महादेव मंदिर, नवरगाव येथे आगमन झाले. यात्रेच्या मिरवणुकिमध्ये चौका चौकात बहुसंख्य महिला व भाविकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यात्रा महादेव मोहल्ला, गुजरी चौक, गांधी चौक, गुरुदेव चौक, आझाद चौक मार्गे निवेदिता संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृह जवळ पोहोचली. त्या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख वक्ते विवेक सरपटवार, भद्रावती यांनी आपल्या जाहीर भाषणातून हिंदू संघटित होणे ही काळाची गरज आहे, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव नवीन पिढीवर पडत आहे, शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथांचे सुरेख वर्णन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय दिपक कवासे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन दीपक जोशी यांनी केले. सभेला महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.