पन्हळघर येथे तक्षशिला बुद्ध विहारांमध्ये वर्षावास कार्यक्रम संपन्न.
✍️ नंदकुमार चांदोरकर✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048📞
माणगाव: गोरेगाव विभागातील उत्कर्ष जागृती मंडळ पन्हळघर या मंडळाच्या विद्यमाने आणि रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघटना पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग व बौद्धजन पंचायत समिती गोरेगाव विभाग व पंचशील महिला मंडळ 32 गांव यांच्या आयोजन नियोजनाने आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत जो वर्षावासाचा प्रबोधनाचा कार्यक्रम गावोगावी घेण्यात आलाआहे, त्यापैकी शेवटचा कार्यक्रम शणिवार दिनांक 07/10/2023 रोजी म्हणजेच पंधरावे शेवटचे पुष्प या माळेतील पन्हळघर गावामध्ये गुंफण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि गोर बंजारा संघटना महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याचे प्रभारी बी आर आडे, पंचशील बौद्ध जनसेवा संघाचे आधारस्तंभ मार्गदर्शक अध्यक्ष आयु. विकास गायकवाड बौद्धजन पंचायत समिती शाखा 841/ 32 गाव विभागाचे अध्यक्ष चंद्रमणी साळवी आणि महिला अध्यक्ष सुप्रिया साळवी तसेच भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका अस्मिता अनिल जाधव, सचिव- संदीप साळवी,राजु मोरे ,आणि विभागातील , संपुर्ण 32 गावातील महिला आणि धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष जागृती मंडळ पन्हळघर या मंडळाचे मुंबई अध्यक्ष अशोक जाधव, प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक संजय जाधव, कोषाध्यक्ष शरद जाधव, सचिव गीतेश जाधव, सभासद रवी जाधव, तसेच स्थानिक भावकीचे अध्यक्ष रामदास जाधव, सचिव विजय जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जाधव, खजिनदार रमेश जाधव, आणि सखाराम जाधव ,विशाल जाधव तसेच स्थानिक भावकीचे सर्व सभासद पदाधिकारी, महिला मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे मोलाचं सहकार्य केलं. बी आर आडे यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं धम्मक्रांती चळवळ कशी गतिमान, तेवत ठेवली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्य आणि तत्व आपण कशी जपली पाहिजेत अंगीकारली पाहिजेत सर्व बहुजन समाजाने एक होऊन जागृत राहिलं पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. बुद्धांच्या काळातील धम्मक्रांती हि बुद्धांनी 80वर्षापर्यंत अविरतपणे चालू ठेवली होती. सम्राट अशोकाचा कालखंड हा सुवर्ण युगाचा कालखंड होता आणि देश कसा सुजलम सुफलाम होता हे त्यांनी सांगितले. आत्ताची देशाची परिस्थिती ही फार बिकट अवस्थेतून चाललेली आहे धर्म अंधश्रद्धा, ढोंगबाजी जुमले बाजी हेच स्तोम माजलेल आहे. आणि त्यामुळे बौद्ध आणि बहुजन समाज यांचे एक नातं असलं पाहिजे जसे तुमच आमचं नातं काय जय शिवराय जय भिमराय असा एक विचार आचार असला पाहिजे त्याकरिता सतत जागृतीचा वनवा तेवत ठेवून सतत प्रबोधनं झाली पाहिजे. असा त्यांनी संदेशही दिला यावेळी प्रकाश शिंदे,पाडूरंग लोखंडे,दिनेश तांबे, हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले.खिरदान देवुन सांगता करण्यात आली. अशा प्रकारे हा कार्यक्रम पूर्ण झाला. विभागातुनआलेले सर्व मान्यवर, बंधू ,भगिनी, धम्म उपासक, उपासिका, सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय जाधव यांनी केले.